इक्बाल मिर्ची प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ईडीच्या पीएमएलए कायद्यांतर्गत वरळीतील सीजे हाऊसमधील त्याच्या मालकीच्या १२व्या आणि १५व्या मजल्यावरील फ्लॅटची अटॅचमेंट रद्द केली. जप्त केलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत १८० कोटी रुपये आहे. ईडीने २०२२ मध्ये ही मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पीएमएलए प्रकरणाबाबत या जप्तीच्या कारवाईविरोधात सेफेमा न्यायाधिकरणात अपील केले.
Read More
राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे नेते खासदर प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील मालमत्तेवर छापामारून ईडीने कारवाई केली. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा हस्तक असलेला व मुंबई बॉंम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्ची प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. प्रफुल्ला पटेलांवर मनी लॉड्रिंगचे आरोप असुन २०१९ मध्ये देखील पटेलांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती.