पुणे : लोहगाव येथून रायगड जिल्ह्यात महाड येथे लग्नासाठी जाणार्या खासगी बसला ताम्हिणी घाटात ( Tamhini Ghat ) भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजण ठार झाले, तर २७ जण जखमी झाले आहेत. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. सर्व २७ जखमींना माणगाव येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.
Read More
लोकसभा निवडणुकांचा अखेरचा टप्प्या येऊन ठेपलेल्या असतानाच राज्यात आता राज्यातल्या एकूण २८ उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या आहेत. त्यातील अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती यांना दहशतवादविरोधी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक पदावर, तर सहपोलीस आयुक्त (गुन्हे) आशुतोष डुंबरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
वर्षाअखेरीस आंबोली पोलिसांची मोठी कारवाई