“ विद्यार्थी ज्यावेळेस गुरुकडे एखादी गोष्ट शिकायाला जातो, तेव्हा संपूर्ण शरणागतीच्या भावनेने त्याने जावं. गाण्याच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की गुरुला शरण गेल्याशिवाय संगीत साधना अशक्य आहे.” असे मत सुप्रसिद्ध व्होयलीन वादक पंडित मिलिंद रायकर यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त दै. मुंबई तरुण भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी आपल्या सांगितीक प्रवासावर भाष्य करताना ते म्हणाले की “ मी ज्या मान्यवरांकडे संगीताचे धडे घेतले, मग ते पंडिचत बी.एस. मठ गुरुजी असतील, दातार गुरुजी असतील, किश
Read More
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने टेक्सासमधील एलन ईस्ट सेंटरमध्ये ४ ते ८४ वयोगटातील एकूण १० हजार लोक भगवद्गीतेचे सामुहिक पठण करण्यासाठी जमले होते. योग संगीता आणि एसजीएस गीता फाऊंडेशनतर्फे भगवद्गीता पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे : त्रास आणि दुःख सहन केल्यानंतरच सुख येते. केवळ पुस्तकी अभ्यास करून यश मिळत नाही. तेव्हा,पुस्तकी ज्ञानासोबतच अंगी कलाकौशल्य व प्रशिक्षण असेल तरच यश मिळेल. असे मौलिक मार्गदर्शन दै. मुंबई तरूण भारत च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त समतोल फाऊंडेशन, शारदा विद्यालय आणि शिक्षक कर्मयोगी यांच्यातर्फे मागील पाच वर्षांत पुनर्वसन केलेल्या मुलांचा मेळावा सोमवारी ठाण्यातील शारदा विद्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन साळवी बोलत होत्या.
सद्गुरू प्राप्तीसाठी कितीही वणवण भटकलं तरी 'सद्गुरू' प्राप्ती होईलच असं नाही. परंतु, सद्गुरू प्राप्तीची आस असेल तर मात्र सद्गुरू किती सहजगत्या सगळं घडवून आणतात आणि आपल्याला स्वतःपाशी बोलवून घेऊन आपल्याला शिष्यत्व बहाल करतात, याची अत्यंत नैसर्गिकरित्या मी स्वतः घेतलेली ही अनुभूती आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरू म्हणजे काय, गुरुपरंपरा काय आहे, याचा विचार करता असे लक्षात येते की, ज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रात जगाच्या पाठीवर विशेषत: आशियाई संस्कृतींमध्ये गुरु-शिष्य ही परंपरा आहे. भारतानेच जगाला गुरुपरंपरेची देणगी दिली आहे, असे म्हणताना अभिमान वाटेल.
गेल्या ३५ वर्षांपासून मेळघाटासारख्या दुर्गम भागात जाऊन, तिथेच राहून वनवासी बांधवांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या, अविरत रुग्णसेवा करणारे एक सुपरिचित नाव म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे. केंद्र सरकारने यंदाच त्यांच्या कार्याची दखल घेऊन 'पद्मश्री' पुरस्काराने गौरव केला. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ. रवींद्र कोल्हे सांगताहेत आपल्या गुरूंविषयी...