भारतातून 'स्टेनेलुरीलस’ या कुळातील तीन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. या तीन प्रजातींपैकी एक महाराष्ट्रातील नाशिकच्या सिन्नर मधून तर इतर दोन प्रजाती आंध्रप्रदेश राज्यातून शोधल्या गेल्या आहेत. हे कोळी 'जम्पिंग स्पायडर' या जाती चे असून त्यांच्या डोळयांच्या विशिष्ठ रचना आणि सतत उडी मारण्याच्या गुणधर्मामुळे ओळखली जाते.
Read More
आग्नेय आणि इशान्य आशियाई देशांमध्ये सापडणारी 'इरुरा' ही कोळ्याची पोटजात प्रथमच भारतात सापडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात संशोधकांना या पोटजातीमधील 'इरुरा मंदारिना' ही प्रजात आढळून आली. या संशोधनाच्या निमित्ताने भारतामधील 'जम्पिंग स्पायडर'च्या यादीत नव्या पोटजातीची भर पडली असून पश्चिम घाटाची जैवविविधता अधोरेखित झाली आहे.