लावणी म्हणजे ‘रसरंगांचं कारंजं! शब्दलावण्य, भावलावण्य यांचा मिलाप साधत घडणारा देखणा कलाविष्कार. या आविष्काराला वेगळं रूप देत आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न होणे हे कौतुकास्पदच. ‘लावणी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटील याने महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. कलेच्या माध्यमातून रसिकांच मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने 'सुंदरी’ द हिस्टरी ऑफ लावणी (अदा ताल शृंगार) या नव्या शो ची संकल्पना आणून आशिष पाटीलने ती यशस्वी केली.
Read More