‘एशियानेट’तर्फे घेण्यात आलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ निवडणूकपूर्व सर्वेक्षणात ७९ टक्के लोकांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला पसंती दर्शविली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना सर्वाधिक पसंती मिळाली असून ८० टक्के लोकांनी मोदी सरकारने जागतिक क्रमवारीत भारताची स्थिती सुधारली असल्याचे सांगितले आहे.
Read More
अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू होते. पण असे असूनही पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत तसूभरही घट झालेली नाही. नुकतेच एक सर्वेक्षण समोर आले आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींना देशातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून संबोधण्यात आले आहे.
२०१४ पासून आज २०२१ मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख उत्तरोत्तर चढाच दिसतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात मोदींना ७४ टक्के पसंती मिळाली असून, ही त्यांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाची पोचपावतीच म्हणावी लागेल. तेव्हा, विरोधकांनी आता कितीही आटापिटा केला, तरी देशातील हा मोदी‘मूड’ पालटणे नाहीच!