भारताची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ५३ किलो वजनी गटात अंतिम पंघालने युरोपच्या जोआना माल्मग्रेन हिचा पराभव करत भारतीयांची मने जिंकली. १९ वर्षीय पंघाल जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी सहावी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. अंतिम पंघालने यासोबतच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळवला आहे. अंतिम पंघाल ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवणारी पहिली कुस्तीपटू ठरली.
Read More