शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. यावरून चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. "मिंधे गट आधी बाप पळवत होता आता मुलंही पळवायला लागले आहेत." असं राऊत म्हणाले.
Read More
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ असेलेले सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव यांना धक्का बसला आहे.