अठराव्या लोकसभेच्या हंगामी सभापतीपदी भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. नव्या खासदारांनी महताब हे शपथ देतील. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्याविषयीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, लोकसभेचे सदस्य भर्तृहरी महताब यांची राज्यघटनेच्या अनुच्छेद ९५(१) अन्वये लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे.
Read More