सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि लाडका सण म्हणजे गणेशोत्सव! संपूर्ण घराण्याला एकत्र आणणार्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सामील करून घेणारा असा हा गणपतीचा उत्सव आहे. सकाळ-संध्याकाळ टाळांच्या गजरात आरती करण्याची मज्जा, गोडाचे जेवण व रात्री जागरण असे बेधुंद वातावरण तयार करणारा गणपती नेमक्या कोणत्या गावचा? आपल्या संस्कृतीत कसा आला? त्याचा प्रवास आणि मूर्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून अपरिचित माहिती देण्यासाठी हा लेखप्रपंच....
Read More
‘राष्ट्र’ ही एक व्यापक संकल्पना आहे. वेदांनी समग्र भूमीलाच ‘राष्ट्र’ म्हणून संबोधले आहे. अथर्ववेदातील बाराव्या कांडातील पहिले सूक्त हे ‘भूमिसूक्त’ म्हणून ओळखले जाते. यात या भूमीवर राहणार्या मनुष्यांसह इतर प्राण्यांची काळजी वाहिली आहे. आपली भूमी सर्वदृष्टीने सुखसंपन्न कशी होईल? तसेच या भूमीवर निवास करणारे नागरिक व इतर प्राणी आनंदाने कसे जगतील, यासंदर्भात सुंदर विश्लेषण एकूण ६३ मंत्रांमध्ये झाले आहे.
‘वेद’ ही परमेश्वराकडून मानवमात्रासाठी मिळालेली सर्वश्रेष्ठ ज्ञानसंपदा होय. सर्वहुत यज्ञस्वरूपी ईश्वराने चार ही वेदांची उत्पत्ती केली आहे, असे ऋग्वेद व यजुर्वेदातही वर्णिले आहे.
जगातील प्रत्येक व्यक्तीची एक स्वत:ची अशी ओळख असते. म्हणूनच ‘मै ऐसा क्यु हूं?’ हा प्रश्न आपल्या सगळ्यांना वेळोवेळी पडतो. इतर लोकं ज्या गंभीर गोष्टी सहज झेलतात, ते आपल्याला का पेलत नाहीत, हा जटील प्रश्न मानसशास्त्राने खूप वेळा घुसळला आहे. पण, त्याचे अमूक उत्तर मिळालेले नाही आणि मिळणारही नाही.