कावीळ झालेल्याला सगळे पिवळेच दिसते, असे म्हणतात. पण, संजय राऊतांना सगळीकडे ‘काळे’ दिसू लागले आहे. बहुधा त्यांना राजकीय कावीळ झाली असावी. ‘वर्षा’ बंगल्यावर रेड्याची शिंगे पुरली, अन्य कोणा मुख्यमंत्र्याला हा शासकीय बंगला फळू नये, म्हणून काळी जादू करण्यात आल्याची बडबड राऊतांनी केली खरी. वास्तविक दुसर्यावर खोटेनाटे आरोप करण्याआधी राऊतांनी स्वतःकडे आणि आपल्या ‘आका’च्या कारनाम्यांकडे डोळसपणे पाहायला हवे. ‘आका’ने कलानगर परिसरात उभारलेल्या ‘मातोश्री-२’ बंगल्याबाबतच्या सुरस कथांवर राऊतांनी अग्रलेख खरडावे.
Read More