‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये ‘अंतर्गत संकट’ नावाच्या प्रकरणात, ज्या तीन संकटांचा उल्लेख आहे, त्यातील जिहादी मुस्लिम कट्टरवादाच्या दहशतीने आज संपूर्ण जग त्रस्त आहे. या शक्ती भारतात ज्या फुटीरतावादी कारवाया करत आहेत, त्याने संपूर्ण देश चिंतित आहे. चर्चद्वारा फसवून-कपटाने होत असलेले कन्व्हर्जन, अनेक अराष्ट्रीय कारवायांना मिळणारे त्यांचे छुपे समर्थन आणि शहरी माओवाद किंवा नक्षलवादाच्या संकटांचे गांभीर्य, आताच्या काही घटनांमुळे सर्वांसमोर आले आहे.
Read More
संघ जातीव्यवस्थेचे समर्थन करतो, संघ आरक्षणविरोधी आहे, संघ घटना मानत नाही, संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ तिरंगा-राष्ट्रध्वजाला मानत नाही, संघ हिंसेचे समर्थन करतो, या सगळ्याच आरोपांबाबत आपली भूमिका ठामपणे सर्वांसमोर ठेवली. संघविरोधकांनी पसरवलेल्या या सर्वच गोष्टींवरील काजळी सरसंघचालकांच्या विचारांतून हटली आणि संघसत्याचा प्रकाश लखलखला.