सोलापूरमध्ये अवैध चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

ख्रिस्ती धर्मगुरु येहान मार्क विरोधात कारवाईची मागणी

    06-Sep-2026   

Solapur Illegal Church Sealed
मुंबई (Solapur Illegal Church Sealed) : सोलापूरच्या बापूजीनगर येथील म्हाडा परिसरात असलेल्या समाज मंदिराजवळील अवैध चर्चवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अखेर टाळे लावून कारवाई केली. गेल्या २५ वर्षांपासून हे चर्च अवैधरित्या खुलेआम सुरु होते. हिंदु जनजागृती समितीसह सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. केवळ परिसर सील करून हे प्रकरण संपत नाही. हिंदू आरक्षणाचा लाभ घेऊन राज्य शासनाची फसवणूक करणाऱ्या त्याचबरोबर धर्मांतराच्या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार असलेल्या ख्रिस्ती धर्मगुरु दत्तात्रेय कानेपागूळ ऊर्फ येहान मार्क याला अटक करण्यात यावी, याबाबत मागणी करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रेय कानेपागूळ याने अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी मिळवली. प्रत्यक्षात ख्रिस्ती धर्म स्वीकारून तो 'येहान मार्क' या नावाने 'जीसस गॉस्पेल सोसायटी' या चर्चचा धर्मगुरु म्हणून धर्मांतराच्या कारवाया करत आहे. कानेपागूळ याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे, आतापर्यंत घेतलेले वेतन व सर्व शासकीय लाभ चक्रवाढ व्याजासह वसूल करावेत आणि त्याच्यासह 'जीसस गॉस्पेल सोसायटी'च्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, धर्मांतरविरोधी कायदा आणि अनुसूचित जाती सत्यापन अधिनियमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. (Solapur Illegal Church Sealed)
 
तसेच 'जीसस गॉस्पेल सोसायटी'ची ट्रस्ट मान्यता रहित करावी आणि धर्मांतरामागील पैशांच्या स्रोताची राज्य शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. पादरी दत्तात्रेय कानेपागूळ याला तात्काळ अटक न केल्यास हिंदु जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारासुद्धा देण्यात आला आहे. (Solapur Illegal Church Sealed)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर