बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला हिरवा झेंडाउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

अजित पवारांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान


Beed Pune Direct Train Service
 
बीड (Beed Pune Direct Train Service) : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने बीडकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. (Beed Pune Direct Train Service)
 
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत या रेल्वेसेवाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यासोबतच बीड शहराच्या सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्राला चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे तसेच धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथे उभारण्यात येणाऱ्या विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. (Beed Pune Direct Train Service)
 
या कार्यक्रमाला खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत उपस्थित होते. (Beed Pune Direct Train Service)
 
यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या बीडच्या रेल्वे जोडणीच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना पुढील वर्षी बीडकरांना थेट पुण्याला जाता येईल, असे आश्वासन दिले होते. आज ते आश्वासन पूर्ण करताना मला विशेष अभिमान वाटत आहे, असे त्या म्हणाल्या. (Beed Pune Direct Train Service)
 
बीड-पुणे रेल्वेनंतर येत्या काही महिन्यांत बीड-पनवेल थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर बीड थेट दक्षिण भारताशी जोडले जाईल आणि त्यातून मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Beed Pune Direct Train Service)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर