मुंबई (UGC NET June 2026 Final Answer Key): UGC-NET जून २०२६ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या UGC-NET जून २०२६ पुनर्परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. यासोबतच या पुनर्परीक्षेचा निकाल आणि Scorecard देखील उपलब्ध करण्यात आला आहे.
९ आणि १० सप्टेंबरला झाली होती पुनर्परीक्षा
UGC-NET जून 2026 अंतर्गत इंग्रजी आणि कॉमर्स विषयांची पुनर्परीक्षा ९ सप्टेंबर २०२६ रोजी, तर समाजशास्त्र विषयाची परीक्षा १० सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात आली होती. देशभरातील ४५४ परीक्षा केंद्रांवर आणि २७२ शहरांमध्ये ही पुनर्परीक्षा पार पडली. (UGC NET June 2026 Final Answer Key)
मूळ परीक्षेतील या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर 'एनटीए' ने पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उमेदवारांना तात्पुरती उत्तरतालिका आणि त्यांच्या रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट तपासण्याची संधी देण्यात आली होती. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकतींचा विषयतज्ज्ञांकडून आढावा घेतल्यानंतर अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.
UGC NET June 2026 Examination Results Declared for English, Commerce, and Sociology.
Candidates can view and download their score cards through the official website.
Please check the official website for further details and updates.
अंतिम उत्तरतालिका च्या माध्यमातून उमेदवारांना त्यांच्या परीक्षेतील उत्तरांची अंतिम पडताळणी करता येणार आहे. तसेच उमेदवार UGC-NET जून २०२६ पुनर्परीक्षेचा गुणपत्रक अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून डाउनलोड करू शकतात. (UGC NET June 2026 Final Answer Key)
कुठे पाहाल उत्तरतालिका आणि निकाल?
उमेदवारांनी ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर संबंधित UGC-NET जून २०२६ पुनर्परीक्षा लिंकवर क्लिक करून अर्ज क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारखेच्या मदतीने लॉगिन करावे. त्यानंतर गुणपत्रक आणि संबंधित परीक्षेची माहिती स्क्रीनवर पाहता व डाउनलोड करता येईल.
दरम्यान, एनटीएच्या माहितीनुसार या पुनर्परीक्षेसाठी १ लाख ९६ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर १ लाख २० हजार ३५५ उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. (UGC NET June 2026 Final Answer Key)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.