एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार

स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि खासगी सुविधा;टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतून प्रकल्प

Hirkani Kaksh Maharashtra ST Bus Stands 
 
मुंबई  (Hirkani Kaksh Maharashtra ST Bus Stands) राज्यातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि खासगी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर पुढील तीन वर्षांत १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. (Hirkani Kaksh Maharashtra ST Bus Stands)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपस्थित होते. प्रवासादरम्यान स्तनदा मातांना बाळाला स्तनपान देण्यासाठी किंवा त्याची निगा राखण्यासाठी सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध व्हावी, हा ‘हिरकणी कक्ष’ योजनेमागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे एसटी बसस्थानकांवर मातांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य होण्यास मदत होणार आहे. (Hirkani Kaksh Maharashtra ST Bus Stands)
 
टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून या कक्षांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक कक्ष अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचा प्री-फॅब्रिकेटेड असणार आहे. त्यामध्ये आवश्यक फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याची सुविधा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत २०२६-२७ मध्ये ५०, २०२७-२८ मध्ये ५० आणि २०२८-२९ मध्ये २५ असे एकूण १२५ कक्ष उभारण्याचे नियोजन आहे. उपलब्ध जागा, स्थानिक गरजा आणि सीएसआर धोरणानुसार या संख्येत आवश्यक बदल करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. (Hirkani Kaksh Maharashtra ST Bus Stands)
 
एसटीकडून जागा आणि पायाभूत सुविधा
 
कक्ष उभारण्यासाठी एसटी महामंडळाकडून अंदाजे ५ मीटर × ५ मीटर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच वीज, पाणी, स्थापनेसाठी आवश्यक सहकार्य आणि शासकीय परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी एसटीची असेल. हा कक्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती, देखभाल आणि देखरेख करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची राहणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही. (Hirkani Kaksh Maharashtra ST Bus Stands)
 
मातृत्वाचा सन्मान करणारा उपक्रम
 
ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाल्याने महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. “‘हिरकणी कक्ष’ हा केवळ सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा सन्मान, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले संवेदनशील पाऊल आहे,” असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. (Hirkani Kaksh Maharashtra ST Bus Stands)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर