मुंबई : (IMF India GDP Growth 7.8 Percent) जीडीपी विकासदर आकडेवारीवरुन रणकंदन उठवणाऱ्या विरोधकांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) दुजोऱ्यामुळे चपराक बसली आहे. भारताच्या विकासदराबद्दल आयएमएफने सकारात्मक टीपण्णी केली आहे. आयएमएफच्या मते, भारत हा जगाचे ग्रोथ इंजिन म्हणून पुढे येत आहे. त्यांच्या मते, अपडेट करण्यात आलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) आणि उत्पादन दर निर्देशांक (पीपीआय) श्रेणीद्वारे भारताचा जीडीपी दर अंदाज अधिक सुसंगत बनण्यास मदत होईल.
दरम्यान, आयएमएफने आर्थिक वर्ष २०२६-२७च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी विकासदर हा अपेक्षेपेक्षा चांगला असल्याचे स्पष्ट केले आहे. वॉशिंग्टन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंट डायरेक्टर जूली कॉझेक यांनी भारताच्या ताज्या जीडीपी आकडेवारीबद्दल टीपण्णी केली. नव्या जीडीपी प्रणालीत आयआयपी आणि पीपीआयच्या नव्या श्रृंखलांचा सामावेश केला आहे. त्यांच्या मते, दोन्ही पद्धतीमुळे जीडीपी अंदाज अधिक स्पष्टपणे मांडता येईल. म्हणजेच येत्या काळात जीडीपी मापन पद्धतीसाठी अद्यावत डेटा घेण्यात येईल. (IMF India GDP Growth 7.8 Percent)
आयएमएफने डेका क्लालिटीबद्दल काय म्हटले?
नव्या पद्धतीनुसार जीडीपी मापन पद्धतीद्वारे भारताच्या मायक्रोनॉमिक डेटा सिस्टीमला अद्याधुनिक करण्याच्या भारताच्या प्रयत्नाबद्दल आयएमएफने कौतूक केले आहे. त्या म्हणाल्या, भारतीय अधिकाऱ्यांनी नव्या सांख्यिकीय रचना आणि डेटाची गुणवत्ता मजबूत करण्याच्या दिशेने पुढे काम केले पाहिजे.” (IMF India GDP Growth 7.8 Percent)
काँग्रेस पुन्हा तोंडघशी
देशात सुरू असलेल्या जीडीपी विकासदर आकडेवारीवरुन वादंगाच्या पार्श्वभूमीवर आयएमएफचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. काँग्रस आणि पक्षाच्या नेत्यांनी आकडेवारीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी केंद्र सरकारने प्रत्युत्तर देत ही नवी पद्धत डेटा सेट आणि बदलत्या डेटा प्रणालीचा आर्थिक अनुमान मजबूत करण्यास मदत करेल, असे म्हटले होते. आयएमएफच्या दाव्यानंतर आता विरोधकांना पुन्हा तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. (IMF India GDP Growth 7.8 Percent)
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.