हलाल प्रमाणपत्राचा ( Halal Certificate ) मुद्दा आज देशभरात चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या हलाल प्रमाणपत्राबाबतच्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडलेल्या युक्तिवादाने या विषयाची व्याप्ती आणि त्यामागील अनागोंदी स्पष्ट केली आहे. मांसाहाराच्या बाबतीत हलाल सर्टिफिकेटचा वापर समजू शकतो. परंतु, लोखंडी सळ्या, बेसन, पाण्याच्या बाटल्या यांसारख्या वस्तूंना हलाल सर्टिफिकेट देणे हा निव्वळ हास्यास्पद प्रकार आहे. हलाल सर्टिफिकेटचा मूळ हेतू मुस्लीम धर्माच्या खाद्य आणि जीवनशैलीशी संबंधित नियमांचे
Read More
डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी शुक्रवार, ८ डिसेंबरला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला माहिती दिली की, २० ऑक्टोबर रोजी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना तंबाखूच्या ब्रँडचा प्रचार केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. खंडपीठाने ९ मे २०२४ रोजी यासंदर्भात सुनावणी ठेवली आहे.
नवी दिल्ली : समलैंगिक विवाहांच्या कायदेशीरतेसंबंधीच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयासमोरील सुनावणीस मंगळवारी प्रारंभ झाला. यावेळी हा मुद्दा न्यायालय नव्हे तर संसदेने ठरविण्याचा आहे, याचा केंद्र सरकारतर्फे पुनरुच्चार करण्यात आला.
नवी दिल्ली : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट अर्थात पीएमएलए कायद्याची घटनात्मक वैधता कायम ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या २७ जुलैच्या निकालाला आव्हान देणाऱ्या पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना दोन मुद्द्यांचे पुनर्विलोकन होणे आवश्यक असल्याचे सांगून नोटीस बजाविली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यांनी सरन्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर होणार आहे.
दिल्ली भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सॉलिसिटर जनरल’ तुषार मेहता यांच्याशी ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा केली. मध्य प्रदेशामधील ओबीसी आरक्षणाचा खटला त्यांनी स्वतः लढला होता, त्यांनाच आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्यावतीने खटला लढवण्याची विनंती केली. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी ना यावर बैठक बोलावली नाही, ना कुणाचा कायदेशीर सल्ला घेतला. जे अडीच वर्षांत झाले नाही, ते २० दिवसांत भाजप-सेना सरकारने करून दाखवले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. यातील खाजगी लॅबमध्ये होत असणाऱ्या चाचण्यांच्या संदर्भात देखील काही सूचना केल्या आहेत.
आपल्याजवळ- तीन चार महिन्यांपेक्षा अधिक काळ नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. ते एका चमत्काराची प्रतीक्षा व अपेक्षा करीत होते. केवळ दैवी वा वैद्यकीय चमत्कारच आपल्याला वाचवू शकतो, हे त्यांना दिसत होते. क्रिकेटमध्ये जसा चमत्कार होतो आणि सामन्याचा रंग बदलतो, तसे आपल्या बाबतीब व्हावे, असे त्यांना वाटत होते. दिल्लीच्या राजकीय क्षितिजावर भाजपचा सत्तासूर्य तळपत असताना, जेटलींना आपला सूर्यास्त स्पष्टपणे दिसत होता आणि शनिवारी दुपारी १२ वाजता बरोबर माध्यान्हाच्या प्रहरी हा सूर्यास्त झाला.