ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू

७४.५० लाख मतदार; ४५.९० लाख फॉर्म डिजिटाईज | ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती

    01-Sep-2026

Thane Voter List SIR 2026

 
ठाणे(Thane Voter List SIR 2026): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) ठाणे जिल्ह्यात सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांपैकी ४५ लाख ९० हजार २४९ (६१.६१ टक्के) सर्वेक्षण फॉर्म डिजिटाईज करण्यात आले आहेत.(Thane Voter List SIR 2026)
 
उर्वरित नोंदींमध्ये ७.३५ लाख स्थलांतरित, २.२२ लाख मयत आणि १७.०८ लाख अनुपलब्ध अथवा शोध न लागलेल्या मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून संख्या ६ हजार ८९४ वरून ६ हजार ८३१ करण्यात आली असून, राजकीय पक्षांच्या १७ हजार ६७० बूथ लेव्हल एजंट्सचा सहभाग आहे.(Thane Voter List SIR 2026)
 
ज्या मतदारांची माहिती २००२च्या एसआयआर मतदार यादीतील नोंदीशी जुळत नाही, त्यांना ईआरओमार्फत नोटीस देऊन सुनावणी घेतली जाणार आहे. १ जुलै १९८७ पूर्वी जन्मलेल्या मतदारांना स्वतःची जन्मतारीख अथवा जन्मस्थळ सिद्ध करणारा एक पुरावा, तर १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान जन्मलेल्या मतदारांना स्वतःचा तसेच आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्मतारीख अथवा जन्मस्थळाचा पुरावा सादर करावा लागणार आहे.(Thane Voter List SIR 2026)
 
जन्म दाखला, पासपोर्ट, एसएससी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, जमीन/घर वाटप प्रमाणपत्र आणि विहित सूचनांनुसार आधारकार्ड आदी कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत.(Thane Voter List SIR 2026)
 
३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दावे-हरकतींचा कालावधी असून, २९ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी व निकालाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नागरिकांनी आपले नाव व तपशील तपासून आवश्यक असल्यास मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.(Thane Voter List SIR 2026)






संबंधित मजकूर