मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एनआरसी लागु करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

    01-Sep-2026

Ramdas Athawale NRC Manipur

 
मुंबई (Ramdas Athawale NRC Manipur) : मणिपुरमध्ये वाढत्या बेकायदेशीर स्थलांतरीतांचा प्रश्न सोडवण्यासाठी 1951 हे मुळ वर्ष ठरवुन मणिपुर राज्यात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) लागु केली पाहिजे. जनगणना किंवा मतदार संघ पुर्नरचना करण्यापूर्वी मणिपुरमध्ये एनआरसी लागु करणे आवश्यक आहे. मणिपुरमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एनआरसी लागु करणे आवश्यक आहे. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची भुमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी स्पष्ट केली. इंफाळमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिबीरात ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाची भुमिका स्पष्ट केली. यावेळी मणिपुरमधील 2 हजार रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विचारमंचावर रिपब्लिकन पक्षाचे मणिपुरचे प्रदेश अध्यक्ष महेश्वर थननजाम, राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय सिन्हा, रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे आदि मान्यंवर यावेळी उपस्थित होते.(Ramdas Athawale NRC Manipur)
 
मणिपुरमध्ये बहुसंख्याक असणा-या मेईतेई समुदायाला अनुसुचित जमातीचा दर्जा मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिले.(Ramdas Athawale NRC Manipur)
 
मणिपुरमध्ये बेकायदेशीर स्थलांतरीतांच्या प्रश्नांचा वाद चालु आहे. मणिपुरमध्ये शांतता अनेक दिवसापासून धोक्यात आलेली आहे. मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करणे यास भारत सरकारचे प्रथम प्राधान्य आहे.मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एनआरसी लागु करणे आवश्यक आहे. मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण काम करीत असल्याची भुमिका ना.रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.(Ramdas Athawale NRC Manipur)
 
मणिपुरमध्ये एनआरसी लागु करावी यासाठी लवकरच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.(Ramdas Athawale NRC Manipur)
 
आगामी काळात मणिपुरमध्ये रिपब्लिकन पक्ष आपले संघटन अधिक बळकट करुन आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.(Ramdas Athawale NRC Manipur)
 
 




संबंधित मजकूर