मोदी-फडणवीस नेतृत्वात महिलांचा आत्मसन्मान आणि आर्थिक स्वावलंबन

महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व : आ. चित्रा वाघ

    01-Sep-2026

Chitra Wagh, Narendra Modi, Devendra Fadnavis, BJP Maharashtra, Women Empowerment, Women Economic Independence,
 
 
मुंबई(Women Empowerment Maharashtra):भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष, आमदार चित्रा वाघ यांनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या जीवनात झालेल्या आमूलाग्र परिवर्तनाचा उल्लेख करत विरोधकांवर सडकून टीका केली.(Women Empowerment Maharashtra)
 
चित्रा वाघ म्हणाल्या, “देशात ५० टक्के महिला मतदार आहेत. मात्र साठ वर्षे या देशात महिलांच्या मूलभूत गरजांचा, त्यांच्या स्वप्नांचा विचारच झाला नाही. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ‘घरची इज्जत म्हणजे देशाची इज्जत’ हा विचार रुजवला गेला. रस्त्यावर, बांधावर जाणाऱ्या बहिणींच्या वेदनेचा आणि संकोचाचा विचार करून स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालये बांधण्याचे काम सुरू झाले.”(Women Empowerment Maharashtra)
 
त्यांनी महिला केंद्रित विविध योजनांचा उल्लेख केला. संस्थात्मक प्रसूतींमध्ये झालेली वाढ, जननी सुरक्षा योजना, माता-शिशु मृत्यूदरात झालेली लक्षणीय घट, मुद्रा योजनेतून हमीविना कर्ज, लखपती दीदी, ड्रोन दीदी यांसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “फेरीवाली ताईंनाही स्वानिधि योजनेतून आत्मसन्मान मिळाला. मोदीजींच्या दूरदृष्टीमुळे महिला विकास मुख्य प्रवाहात आला आहे,” असे त्या म्हणाल्या.(Women Empowerment Maharashtra)
 
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महिलांना सन्मान, एकल महिला धोरण, धर्मांतरविरोधी कायदा, मुलांच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख, राजमाता जिजाऊ योजना, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोफत सुविधा आणि स्टॅम्प ड्युटीतील सवलती यांसारख्या योजनांमुळे महिलांना नवा आत्मविश्वास मिळत असल्याचे चित्रा वाघ यांनी अधोरेखित केले. “आज शेतकरी महिलांच्या नावावर योजना आहेत. नवऱ्याच्या नावाऐवजी तिच्या नावावर काम होत आहे. ही खरी क्रांती आहे,” असे त्यांनी सांगितले.(Women Empowerment Maharashtra)
 
गडचिरोलीतील आश्रमशाळेतील तीन मुलींच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसच्या माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्यावर जबाबदारी टाकली आणि राहुल गांधी यांना जाब विचारण्याचे आव्हान दिले. “पूर्वीच्या काळात आश्रमशाळांमध्ये टॉयलेट नव्हते, बेड नव्हते, खिडक्या नव्हत्या. ७० टक्के मुलींची परिस्थिती दयनीय होती. आधी स्वतःच्या घरातली घाण साफ करा, मग सरकारवर बोंब मार,” असे त्यांनी टोला मारला.(Women Empowerment Maharashtra)
 
३३ टक्के महिला आरक्षणाबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “हे मोदीजींचे स्वप्न आहे. विरोधक मोठमोठ्या गप्पा मारतात, पण जेव्हा आरक्षणाचा प्रश्न आला तेव्हा हात मागे घेतले. पुरुष खासदारांनीच नव्हे, महिला खासदारांनीही विरोध केला. काँग्रेसमध्ये पुरुषसत्ताक मानसिकता आहे. प्रियंका गांधी अधिक सक्षम असतानाही राहुल गांधींना नेतृत्व दिले गेले. हीच खरी पितृसत्ता आहे.”(Women Empowerment Maharashtra)
 
शेवटी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाताला बळकटी देण्याचे आवाहन करत प्रस्तावास अनुमोदन दिले. “महिलांना केवळ योजनांचा लाभ न देता आर्थिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर आणि विकासाच्या मुख्य प्रवाहातील भागीदार बनवणे हीच खरी दिशा आहे. या दिशेने होणाऱ्या प्रवासाचा भाग होण्याचा अभिमान आहे,” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.(Women Empowerment Maharashtra)
 
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्याला विशेष महत्त्व दिले गेले.(Women Empowerment Maharashtra)
 
 




संबंधित मजकूर