नागपूर : (Vico Laboratories) विको लॅबोरेटरीजचे समुह संचालक सुमंत पेंढरकर यांचे रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. परदेशी ब्रँड्सच्या आव्हानांतही भारतीय उद्योजकता आणि आयुर्वेदाची ताकद जागतिक बाजारपेठेला दाखवून देणारा उद्यमी, अशी त्यांची ओळख होती. त्यांनी विको लॅबोरेटरीजमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळली.(Vico Laboratories)
सौदर्य प्रसाधनांच्या जागतिक बाजारपेठेत असलेल्या स्पर्धात्मक वातावरणात आयुर्वेदाची ताकद त्यांनी जगाला दाखवून दिली. पेंढारकर कुटूंबातील पिढ्यांनी एकत्र येत हा व्यवसाय जागतिक स्तरावर पोहोचवला. केवळ नफ्याचा व्यवसाय न करता, भारतीय मूल्यांवर अधिष्ठित उद्योग कसा उभारावा,
याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या कर्तृत्वाने घालून दिला. उद्योग क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करत असतानाही त्यांची साधी राहणी, समाजभान आणि निष्ठा कधीच ढळली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी मृणालीनी, पुत्र देवेश, मुलगी माधवी आणि सुन लीना, असा परिवार आहे. (Vico Laboratories)
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.