घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा; वडेट्टीवारांकडून पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर

    03-Aug-2026   
Pankaja Munde
 
मुंबई : (Pankaja Munde) राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपमधून बाहेर पडावे. त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवणार, अशी ऑफर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी, दिली. मात्र, काँग्रेसची आजची अवस्था पाहता वडेट्टीवारांची ही ऑफर म्हणजे 'घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा' अशी दिसते.
 
अलीकडेच मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना राजकीय निवृत्तीबाबत वक्तव्य केले होते. हाच धागा पकडत विजय वडेट्टीवार म्हणाले की, "पंकजा मुंडे यांना पक्षात न्याय मिळत नाही असे वाटत असल्यास त्यांनी पक्षातून बाहेर पडावे आणि ओबीसींचे नेतृत्व करून महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हावे. यासाठी आम्ही त्यांना साथ देऊ. त्या भाजपमधून बाहेर पडल्यास हायकमांडला विचारून त्यांना काँग्रेसमध्ये घेऊ," असे ते म्हणाले.(Pankaja Munde)
 
वडेट्टीवारांची ऑफर कुणाच्या बळावर?
 
मात्र, साधा एक आमदार निवडून आणतानाही आटोकाट तडजोडी कराव्या लागणाऱ्या काँग्रेसने पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याची ऑफर देणे हास्यास्पदच म्हणावे लागेल. राज्यात पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी नाकीनऊ आलेले असताना वडेट्टीवारांनी एवढे मोठे विधान कोणाच्या बळावर केले? हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय काँग्रेसला पक्षात आहे ते नेते सांभाळता येत नाही इतरांना पक्षात येण्याची ऑफर देणे सुरु असल्याचे दिसते.(Pankaja Munde)
 
दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेसमध्ये अनेक सक्षम महिला नेत्या असतानाही सध्या सत्तेत मंत्रीपदावर असलेल्या इतर पक्षातील महिला नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न दाखवणे म्हणजे मोठा विनोदच आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि राज्यातील ओबीसी समाजातील प्रभावी चेहरा मानल्या जातात. त्यांनी वेळोवेळी आपल्या पक्षासोबतची निष्ठाही बोलून दाखवली आहे. अशावेळी त्यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देऊन चर्चेत येण्यापलीकडे विजय वडेट्टीवारांना दुसरे काहीही साध्य होणार नाही. (Pankaja Munde)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर