एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन केली यामिनी जाधव यांची विचारपूस

    03-Aug-2026
Eknath Shinde
 
मुंबई: (Eknath Shinde) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार व विद्यमान नगरसेविका यामिनी जाधव यांची रविवार दि.२ रोजी ब्रिच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली.याप्रसंगी यामिनी जाधव यांचे पती व भायखळा शिवसेना विभागप्रमुख यशवंत जाधव उपस्थित होते.
 
शिवसेना माजी आमदार व नगरसेविका यामिनीताई जाधव या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंजत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्याने त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
रविवार दि.२ रोजी रुग्णालयात जाऊन शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामिनीताईंची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी अपेक्षाही एकनाथ शिंदे यांनी यासमयी व्यक्त केली. (Eknath Shinde)
 
 




संबंधित मजकूर