मुंबई : (Navnath Ban) "उबाठा पक्ष ९९ टक्के रिकामा झाला आहे,तुमचे जेवढे खासदार आहेत ते रिक्षात बसुन जाऊ शकतात.त्याच आत्मचिंतन जनाब संजय राऊत यांनी कराव.नाशिकमध्ये कुंभमेळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सभेपूर्वीचे फोटो काढायचे,त्याला सभेचा ऑडीओ लावायचा,एडीट करुन फोटो ट्वीट करायचे हा जुना धंदा संजय राऊत तुमचा आहे.कुंभमेळ्याच्या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात साधूसंत आणि नाशिककरांनी हजेरी लावली होती.आम्ही हिंदूंचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करणार आहोत.त्यांनी मात्र आपल्या पक्षातील खुर्च्या सांभाळाव्यात ज्यादेखील भविष्यात शिल्लक ऱाहणार नाहीत." असा प्रहार भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवार दि.२९ रोजी केला.
"साधुसंत मोठ्या उत्साहात कुंभमेळ्याच्या तयारीस लागले आहेत.ज्यांनी पालघरच्या साधु हत्याकांडाबद्दल कोणतीही कारवाई केली नाही अशा महाविकास आघाडीने साधूसंतांबद्दल न बोललेल बर,तेंव्हा साधुसंतांच मॉबलिंचींग झाल त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते त्यामुळे उबाठा आणि संजय राऊत यांना साधुसंतांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही."असेही बन म्हणाले.(Navnath Ban)
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतल आहे आणि नाशिकची विकासकाम जोरात सुरू आहेत.जेंव्हा ही काम पूर्ण होतील तेव्हा नाशिककर त्याच भव्य स्वागत करतील.टेंडर आणि कमीशनबाजी ही परंपरा उबाठा आणि संजय राऊत यांची आहे.राऊत यांना भ्रष्टाचारप्रकरणी १०० दीवस आर्थर रोड तुरूंगात रहाव लागल त्यांनी भ्रष्टाचारावर बोलाव.खंडणी आणि कमीशन खोरी ही उबाठाची परंपरा आहे.आता कुठेही भ्रष्टाचार होत नाही."असे मत बन यांनी व्यक्त केले.(Navnath Ban)
"माकडाच्या हाती मशाल अशी उबाठाची अवस्था आपण विधानसभेस बघीतली आहे.ती मशाल विझवण्याच काम राज्यातील जनतेन केल आहे.आपला पक्ष जाळुन टाकण्याच काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे.गांधीजींची माकड काय होती हा इतिहास लोकांना माहीत आहे.हिंदूच्या श्रध्देवर घाला घालायचा,कुंभमेळ्याला.राम मंदीरास बदनाम करायच आणि औरंगजेब,बाबराचा उदो,उदो करायचा ही परंपरा दुर्देवान उबाठानं सुरू केली आहे.इस्तीमाच स्वागत राऊतांनी जोरजोरात केल असत.पण हिंदू एकत्र आले की दाढ्या कुरवाळण बंद होईल म्हणून राऊत विरोध करत आहेत." असा घणाघात बन यांनी केला.(Navnath Ban)
"स्वप्ना पाटकर ताई एक पुस्तक लिहू इच्छीतात ते प्रकाशीत होऊ नये यासाठी संजय राऊत काही गुंडांकडून धमक्या देत आहेत.काऱण धक्कादायक खुलासे त्या पुस्तकात आहेत.२०१९ ला उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देऊ असे कुठेही ना भाजप ना अमित शहा यांनी सांगितले होते.उध्दव ठाकरे,संजय राऊत यांच्या समोर सभेत सांगितल होत की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.पण कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून जनाब उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले." असा घणाघात त्यांनी केला.(Navnath Ban)