सुरत: (Surat Food Poisoning case) महाराष्ट्रात सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्न आणि अॅनालॉग पनीरविरोधात कठोर मोहीम उघडलेली असतानाच, शेजारील गुजरात राज्यातून अन्न विषबाधेची एक अत्यंत भीषण आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सुरत येथील एका हॉटेलमधून मागवलेले 'काजू पनीर चीज' खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांना गंभीर विषबाधा झाली. या दुर्दैवी घटनेत आर्या कालसरिया या पाच वर्षांच्या चिमुकलीचा आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर चार सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Surat Food Poisoning case)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अशोकभाई कालसरिया यांच्या कुटुंबाने स्थानिक हॉटेलमधून काजू पनीर चीज आणि इतर खाद्यपदार्थ मागवले होते. जेवण केल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना अस्वस्थ वाटू लागले होते, मात्र सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. १६ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अशोकभाई आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीच्या (आर्या) पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्रास वाढल्याने त्यांनी तातडीने रुग्णालय गाठले. (Surat Food Poisoning case)
रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कुटुंबाला खाद्य विषबाधा झाल्याची पुष्टी केली आणि उपचार सुरू केले. आर्याची तब्येत वेगाने बिघडल्याने तिला तातडीने अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे ठरले आणि उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशोकभाई यांच्यासह कुटुंबातील उर्वरित तीन सदस्यांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Surat Food Poisoning case)
#WATCH | Surat, Gujarat: Restaurant shut by Health Department as one child dies, three others hospitalised in suspected food poisoning.
Food Safety Officer, SMC, Sejal Vyas says, “Our team arrived here early this morning in response to a complaint regarding food poisoning. We… pic.twitter.com/Sal9t9tOmu
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच गुजरातमधील अन्न व औषध प्रशासन/अन्न सुरक्षा विभागाने तातडीने पावले उचलली. अधिकाऱ्यांच्या पथकाने संबंधित हॉटेलवर धाड टाकून ते हॉटेल तात्काळ सील केले आहे. पनीर आणि चीजचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी हॉटेल मालक व व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Surat Food Poisoning case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.