सीएम फेलोशिपमधून प्रशासनाला नवा दृष्टिकोन; फेलोंनी परिवर्तनाचे दूत बनावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

Chief Minister
 
मुंबई : (Chief Minister's Fellowship Programme) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टिकोन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. फेलोंनी या अनुभवाचा उपयोग आपल्या कार्यक्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.(Chief Minister's Fellowship Programme)
 
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या ॲप्रिसिएशन आणि नवीन बॅचच्या कमेन्समेंट कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार, वरिष्ठ अधिकारी, आयआयटीचे प्राध्यापक, फेलोशिप कार्यक्रमाचे समन्वयक आणि सीएम फेलोज उपस्थित होते.
 
फेलोशिप कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनामध्ये अनुभवी आणि गुणवत्तापूर्ण अधिकारी असले तरी दीर्घकाळ एकाच पद्धतीने काम करताना कल्पकता आणि जनतेशी असलेला प्रत्यक्ष संपर्क काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनात नवे विचार आणणे आणि तरुणांना शासनाची कार्यपद्धती समजून देणे, हा फेलोशिप कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.(Chief Minister's Fellowship Programme)
 
प्रशासनालाही नवे विचार आणि दृष्टिकोन
 
‘फेलोशिप’ हा एकतर्फी अनुभव नसून फेलोंकडून प्रशासनालाही नवे विचार आणि दृष्टिकोन मिळतात. नवीन पिढीच्या आकांक्षा आणि कार्यपद्धती समजून घेतल्याशिवाय सर्वसमावेशक प्रशासन शक्य नाही. त्यामुळे बदल स्वीकारून प्रशासन अधिक गतिमान होणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
सीएम फेलोंनी स्टार्टअप धोरण, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, जिल्हास्तरीय वॉर रूम्स, विविध डॅशबोर्ड्स, जलयुक्त शिवाराचे जीआयएस मॅपिंग, ‘मागेल त्याला शेततळे’, ई-गव्हर्नन्स, तक्रार निवारण व्यवस्था, चॅटबॉट्स आणि महाराष्ट्र युनिक इन्फ्रा आयडी यांसारख्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.(Chief Minister's Fellowship Programme)
 
 
नवी कार्यसंस्कृती विकसित  
 
प्रशासनामध्ये बदल घडवण्यासाठी केवळ शासन निर्णयाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. लोकाभिमुख आणि सोपी कार्यपद्धती आधी स्वीकारून त्यानुसार शासन निर्णय करण्याची नवी कार्यसंस्कृती विकसित झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
शासनाच्या १०० दिवसांच्या आणि १५० दिवसांच्या कार्यक्रमांतही फेलोंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आवास योजना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, लखपती दीदी, शेतकरी आणि महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच आदिवासी भागातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कामात फेलोंनी प्रभावी भूमिका बजावल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून
 
‘मी एकटा किती परिवर्तन करू शकणार?’ असा विचार न करता परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी. फेलोशिपमधून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग समाजाच्या आकांक्षा आणि गरजा समजून घेण्यासाठी करून आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन त्यांनी केले. नवीन बॅचने मागील बॅचपेक्षा अधिक चांगले आणि नावीन्यपूर्ण काम करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन फेलोंना शुभेच्छा दिल्या.(Chief Minister's Fellowship Programme)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर