जकार्ता: (Indonesia Earthquake) इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावर आज सकाळी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला. या तीव्र धक्क्यांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. (Indonesia Earthquake)
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ६ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू एंडे शहरापासून सुमारे ६८ किलोमीटर अंतरावर समुद्राखाली होता. पहिल्या मोठ्या धक्क्यानंतर ५.९, ५.६ आणि ६.१ तीव्रतेचे लागोपाठ सौम्य धक्के नोंदवण्यात आले आहेत. (Indonesia Earthquake)
A powerful 7.7-magnitude undersea earthquake struck off the northern coast of Indonesia's Flores Island, triggering tsunami warnings across several coastal provinces. Indonesian meteorological agencies urged residents in impacted areas to evacuate immediately to higher ground and… pic.twitter.com/lcbLMBfpfy
भूकंपानंतर नागेकेओ परिसरातील किनारी भागांमध्ये समुद्र अचानक खवळल्याचे दिसून आले. समुद्राच्या लाटांचे भयानक स्वरूप पाहून नागरिकांमध्ये त्सुनामीची तीव्र भीती पसरली आणि त्यांनी तातडीने सुरक्षिततेसाठी उंच व अंतर्गत भागात पळ काढला. सुरुवातीला प्रशासनाकडून काही किनारी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता; मात्र परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काही तासांनी हा इशारा मागे घेण्यात आला. (Indonesia Earthquake)
भूकंपामुळे अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले असून सोशल मीडियावर याचे भयानक व्हिडिओ समोर आले आहेत. सिक्का येथील सेंट पीटर मेजर सेमिनरी मध्ये सकाळची प्रार्थना सुरू असताना सभागृहाच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. जीव वाचवण्यासाठी बाहेर धावताना एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रुग्णालयांमधील रुग्णांना तात्काळ इमारतींबाहेर मोकळ्या जागेत हलवण्यात आले. स्ट्रेचर, ऑक्सिजन सिलिंडर आणि आयव्ही स्टँडच्या मदतीने रुग्णालयांच्या बाहेरच तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. (Indonesia Earthquake)
🎥 More videos are surfacing of the exact moment the earthquake hit Indonesia, following the powerful magnitude 7.7 quake recorded off the coast of Flores Island. Footage shows buildings shaking and residents rushing outside as the tremor struck. A tsunami warning remains in… pic.twitter.com/ntZ67G8reo
स्थानिक अधिकाऱ्यांनी नागरिकांना नुकसान झालेल्या आणि कमकुवत झालेल्या इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, येत्या काळात भूकंपाचे आणखी सौम्य धक्के बसण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. (Indonesia Earthquake)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.