मुंबई (Sagara Pran Talmalala Drama) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याला आणि विचारांना अभिवादन करणाऱ्या 'सागरा प्राण तळमळला' या मधुसूदन कालेलकर लिखित महानाट्याच्या अभिवाचनाचे आयोजन मंगळवार, ७ जुलै रोजी सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर रंगमंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक (दादर), स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र (पार्ले), स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य, क्रांतिकारकांचे चरित्रकार वि श्री जोशी साहित्य अभ्यास मंडळ आणि स न वि वि रंगयात्रा, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Sagara Pran Talmalala Drama)
या अभिवाचनात माधवी जोगळेकर, किर्ती मराठे, मानसी बापट, सुवर्णा जोशी, विद्या महाजन, मीनल कुलकर्णी, विजय पोयरेकर, दत्ता सुतार, राजेश सारंग, केदार गडकरी आणि सुहास वाईरकर हे कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे पार्श्वसंगीत अरीन पाटकर यांचे असून रणजीत सावरकर, राजेंद्र वराडकर, केशव परांजपे सर आणि मंजिरीताई मराठे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन डॉ. शिरीष ठाकूर यांनी केले आहे. (Sagara Pran Talmalala Drama)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रनिष्ठ, क्रांतिकारी आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचे प्रभावी नाट्यमय सादरीकरण अनुभवण्याची संधी या अभिवाचनातून रसिकांना मिळणार असून, इतिहासप्रेमी, साहित्यप्रेमी आणि नाट्यरसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (Sagara Pran Talmalala Drama)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक