प्रख्यात चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

    15-Jun-2026   
Suhas Bahulkar
 
मुंबई : (Suhas Bahulkar) संस्कार भारती, लोकमान्य सेवा संघ, आणि भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने कला अभ्यासक तथा ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या "कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या" या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
मंगळवार दि. २३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता पु. ल. देशपांडे सभागृह, तिसरा मजला, टिळक मंदिर, राम मंदिर रस्ता, विले पार्ले (पूर्व) येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
 
सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मा. श्री. भय्याजी जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष तथा सर ज. जी. कला वास्तुकला आणि अभिकल्प विद्यालयाचे कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर तथा राजहंस प्रकाशनाचे ज्येष्ठ संपादक आनंद हर्डीकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.
 
या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. (Suhas Bahulkar)
 
 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर