ठाकुर्लीतून संशयित नक्षलवाद्याला एटीएसकडून अटक! झारखंड सरकारने जाहीर केले होते १० लाखांचे बक्षीस!

    07-Nov-2026   
 
ATS Arrests Suspected Naxalite in Thakurli
 
मुंबई (ATS Arrests Suspected Naxalite in Thakurli) : ठाणे जिल्ह्यात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत एका संशयित नक्षलवाद्याला अटक केली आहे. संजय सरोज यादव ऊर्फ संजय गोडरे आणि बुधराम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ठाकुर्ली परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. आरोपीच्या अटकेसंदर्भात माहिती देणाऱ्यास झारखंड सरकारने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
 
महाराष्ट्र एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, संजय सरोज यादव हा मूळचा झारखंडमधील जंगल परिसरातील रहिवासी आहे. तो गेल्या सुमारे १० दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली परिसरात वास्तव्यास होता. तो येथे कोणत्या उद्देशाने आला होता आणि गेल्या काही दिवसांपासून या भागात का राहत होता, याचा तपास यंत्रणांकडून केला जात आहे. (ATS Arrests Suspected Naxalite in Thakurli)
 
अटकेनंतर आरोपीला शनिवारी एटीएस न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस त्याची चौकशी करून ठाण्यात येण्यामागील उद्देश तसेच त्याचे अन्य संभाव्य संपर्क आणि संबंध यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. (ATS Arrests Suspected Naxalite in Thakurli)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर