वॉशिंग्टन (US Midterm Election Results 2026) : अमेरिकेच्या मिडटर्म (मध्यावधी) निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील उर्वरित दोन वर्षांत त्यांच्या सरकारसमोर विरोधकांचे आव्हान वाढणार आहे. डेमोक्रॅट्सच्या या विजयामुळे अमेरिकेच्या राजकारणात नव्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
मिडटर्म (मध्यावधी) निवडणुकीत नेमकं काय घडलं?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर होणाऱ्या निवडणुकांना मिडटर्म इलेक्शन म्हणतात. या निवडणुकीत प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी, तर सिनेटच्या १०० पैकी ३५ जागांसाठी मतदान झाले. याशिवाय ३६ राज्यांच्या गव्हर्नरपदांसाठीही निवडणुका पार पडल्या. (US Midterm Election Results 2026)
या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मागे टाकत बहुमत मिळवले. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये ट्रम्प सरकारच्या निर्णयांना विरोध करण्याची आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची संधी डेमोक्रॅट्सना मिळणार आहे.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्येही डेमोक्रॅट्सचे बहुमत
अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये एकूण ४३५ जागा आहेत. येथे बहुमतासाठी किमान २१८ जागा जिंकणे आवश्यक असते. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने २१८ जागांचा टप्पा पार करत सभागृहावर नियंत्रण मिळवले आहे. (US Midterm Election Results 2026)
रिपब्लिकन पक्षाकडून हे सभागृह आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अनेक मतदारसंघांमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवारांनी विजय मिळवल्याने रिपब्लिकन पक्षाला सत्ता गमवावी लागली.
सिनेटमध्येही रिपब्लिकन पक्षाला धक्का
अमेरिकेच्या सिनेटमध्ये एकूण १०० जागा आहेत. या निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत होते. मात्र, निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने अनेक रिपब्लिकन बालेकिल्ल्यांमध्ये विजय मिळवत सिनेटचे नियंत्रणही आपल्या हाती घेतले. (US Midterm Election Results 2026)
कॅन्सस, टेक्सास, दक्षिण कॅरोलिना, ओहायो यांसारख्या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवारांनी विजय मिळवला. त्यामुळे सिनेटमधील सत्तासमीकरण बदलले आहे.
कॅन्ससमध्ये ९४ वर्षांनंतर डेमोक्रॅटिक उमेदवाराचा विजय
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या निकालांपैकी एक म्हणजे कॅन्सस राज्यातील सिनेटची जागा. येथे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ॲडम हॅमिल्टन यांनी रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान सिनेटर रॉजर मार्शल यांचा पराभव केला. (US Midterm Election Results 2026)
विशेष म्हणजे, १९३२ नंतर म्हणजेच तब्बल ९४ वर्षांनंतर कॅन्ससमधून डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार सिनेटवर निवडून आला आहे. २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी कॅन्ससमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. असे असतानाही यंदा या राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाने विजय मिळवला.
६२ वर्षीय ॲडम हॅमिल्टन हे अमेरिकेतील मोठ्या मेथोडिस्ट चर्चपैकी एक असलेल्या ‘चर्च ऑफ द रिझरेक्शन’चे संस्थापक पाद्री आहेत. (US Midterm Election Results 2026)
बराक ओबामा यांच्याकडून विजयाचे स्वागत
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयाचे स्वागत केले आहे. अमेरिकन जनतेने स्पष्ट संदेश दिला असून, देशाला विभागणारे नव्हे तर लोकांना एकत्र आणणारे नेतृत्व हवे असल्याचे त्यांनी म्हटले. (US Midterm Election Results 2026)
ट्रम्प सरकारच्या कार्यकाळातील आणखी दोन वर्षे शिल्लक असल्याचे सांगत, डेमोक्रॅट्सनी जिथे बदल घडवण्याची संधी मिळेल तिथे काम करावे, असे आवाहनही ओबामा यांनी केले.
भारतीय वंशाचे रो खन्ना सलग सहाव्यांदा विजयी
कॅलिफोर्नियाच्या १७व्या संसदीय मतदारसंघातून भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक खासदार रो खन्ना यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. त्यांनी रिपब्लिकन उमेदवार रितेश टंडन यांचा पराभव केला. हा रो खन्ना यांचा सलग सहावा विजय आहे.
२०१७ पासून ते अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य आहेत. चीनचे धोरण, तंत्रज्ञान, व्यापार आणि आर्थिक विषमता यांसारख्या मुद्द्यांवर ते सातत्याने भूमिका मांडत आले आहेत.
ट्रम्प यांनी पराभवासाठी फॉक्स न्यूजला धरले जबाबदार
मिडटर्म निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजवर टीका केली आहे. वृत्तवाहिनीने आपल्या कार्यक्रमांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना सातत्याने स्थान दिल्यामुळे रिपब्लिकन पक्षाला नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. (US Midterm Election Results 2026)
न्यूयॉर्कचे माजी महापौर बिल डी ब्लासिओ यांना फॉक्स न्यूजच्या कार्यक्रमात बोलावल्याबद्दलही ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. डी ब्लासिओ हे न्यूयॉर्कच्या इतिहासातील सर्वात वाईट महापौर असल्याची टीका त्यांनी केली. (US Midterm Election Results 2026)
आता ट्रम्प यांची खुर्ची जाणार का?
मिडटर्म निवडणुकीतील पराभवामुळे ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची खुर्ची लगेच जाणार नाही. मात्र, काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण आल्याने त्यांच्या सरकारच्या धोरणांना विरोध होऊ शकतो. तसेच, विविध सरकारी निर्णयांची चौकशी आणि प्रशासनावर देखरेख वाढवण्याची संधी विरोधकांना मिळणार आहे.
ट्रम्प यांना यापूर्वी २०१९ आणि २०२१ मध्ये दोन वेळा महाभियोगाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. दोन्ही वेळा सिनेटमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. आता डेमोक्रॅट्स पुन्हा महाभियोगाची प्रक्रिया सुरू करू शकतात, अशी चर्चा आहे. (US Midterm Election Results 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.