पुणे : (Nitish Bharadwaj Pune Rally)"विरोधी पक्षनेते राहुल गांधी, नेहा बोरा आणि लोकशाही तसेच संविधानाला आव्हान देणाऱ्या फुटीरतावादी शक्तींनी आपल्या मर्यादेत राहावे. विनाकारण अराजकता माजवून सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे प्रयत्न थांबवावेत, अन्यथा देशातील सज्जनशक्ती तुम्हाला त्यापेक्षा अधिक ताकदीने प्रत्युत्तर देईल," असा इशारा प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांनी दिला.
‘अराजकतेला नकार, लोकशाहीला समर्थन’ आणि ‘माझा देश, माझी जबाबदारी’ या भावनेतून ‘मी भारत प्रेमी’ या संघटनेच्या वतीने पुण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी उद्यानापासून सुरू झालेल्या या मोर्चाची सांगता डेक्कन जिमखाना येथे झाली. या वेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना नितीश भारद्वाज बोलत होते.(Nitish Bharadwaj Pune Rally)
देशाची एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी, तसेच समाजात अराजकता व अविश्वास पसरवणाऱ्या प्रवृत्तींविरोधात जनजागृती करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसह ५,००० हून अधिक पुणेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
नितीश भारद्वाज पुढे म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न आणि मत शांततापूर्ण मार्गाने मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, लोकशाहीच्या नावाखाली अराजकतेला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणे आणि सामाजिक सलोखा बिघडवणे अत्यंत चुकीचे आहे. मतभेद असणे हा लोकशाहीचा भाग आहे; परंतु मतभेद व्यक्त करताना कायद्याचा आदर आणि सामाजिक जबाबदारी जपणे आवश्यक आहे."(Nitish Bharadwaj Pune Rally)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक