मुंबई (प्रतिनिधी) : गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरात समता संकल्प सोसायटीच्या आवारात वावरात वावरणाऱ्या बिबट्याला गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी वन विभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले (leopard). या बिबट्याच्या हालचाल ही सोसायटीच्या आवारात असल्याने येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी पिंजरा बसवून त्याला पकडण्यात आले. (leopard)
समता संकल्प सोसायटीचे व्यवस्थापक प्रशांत सदानंद धोत्रे यांनी ९ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या वावराबाबत वन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोसायटीच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने या परिसरात जनजागृती करण्यास सुरुवात केली. सोसायटीच्या परिसरात मैदान आणि मंदिर असून, या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आला होता. सोसायटीच्या आवारातील इमारतीजवळ आणि मंदिर परिसरात बिबट्या वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मंदिराच्या बाजूला झाडेझुडपे आणि अडगळीचा जागा आहे. अशा जागेत बिबट्याकडून हल्ला होण्याची शक्यता दिसून येत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी बिबट्याच्या वावराची माहिती वन विभागाला दिली होती.
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने १५ नोव्हेंबर रोजी सोसायटीच्या आवारात पिंजरा लावला होता. त्यानंतर वन विभागाच्या पथकाकडून नियमितपणे दिवस-रात्र गस्त घालून पिंजऱ्याची पाहणी केली जात होती.अखेर गुरुवारी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बिबट्याची तपासणी करण्यात आली.