बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत (white colored leopard).
Read More
महाराष्ट्राला पहिल्यांदाच बिबट्याच्या दृष्टीने त्याचे जग कळले आहे. कारण, 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) जुन्नर वन विभागाच्या मदतीने बिबट्याला लावलेल्या 'कॅमेरा काॅलर'चे छायाचित्रण समोर आले आहे (camera radio collar on leopard). जुन्नरमध्ये एका बिबट्याला कॅमेरा असणारा रेडिओ काॅलर लावण्याचा प्रयोग करण्यात आला आहेत (camera radio collar on leopard). यामाध्यमातून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला (camera radio collar on leopard). महाराष्ट्रात एखाद्या वन्यजीवाला कॅमेरा असणारा रेडिओ काॅलर लावण्याचा
नाशिक तालुक्यातील देवळा परिसरात मंगळवार दि. २५ मार्च रोजी कांद्याच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळले होते (leopard cub reunion). वन विभागाने 'रेस्क्यू-नाशिक' संस्थेच्या मदतीने या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवून दिली (leopard cub reunion). मात्र, या निमित्ताने ऊसाच्या शेतात अधिवास करणारा बिबट्या आता कांद्याच्या शेतात देखील आपले बस्तान बसवण्याच्या तयारीत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (leopard cub reunion)
रत्नागिरी जिल्ह्यात रविवार दि. १६ मार्च रोजी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला (leopard death in ratnagiri). चिपळूणमधील घटनेत कुत्र्याला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत झालेल्या झटापटीत इसमाने स्वसंरक्षणासाठी बिबट्याच्या शरीरात भाला घुसवून त्याच्या जीव घेतला (leopard death in ratnagiri). तर रत्गागिरीत लोखंडी तारेच्या फाश्यात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना शिकारीच्या असून वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (leopard death in ratnagiri)
लोणावळ्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या पवना तलावाजवळ शुक्रवार दि. ७ मार्च रोजी सकाळी बिबट्याचा वावर आढळून आला. झाडावर चढलेल्या बिबट्याला स्थानिकांनी पकडण्याचा प्रयत्न केल्याने सहा जण जखमी झाले. मात्र, वन विभागाने प्रसंगावधान राखून 'रेस्क्यू-पुणे'च्या मदतीने स्थानिकांकडून बिबट्याचा ताबा मिळवला आणि त्याला वन्यजीव बचाव केंद्रात हलविले. (pawna lake leopard rescue)
सातारा जिल्ह्यातील कास पठाराला लागून असलेल्या जंगलात दुर्मीळ 'लेपर्ड कॅट'चे दर्शन घडले आहे (leopard cat). साताऱ्यातील वन्यजीव निरीक्षक सागर कुलकर्णी यांनी या प्रजातीची नोंद केली आहे (leopard cat). यानिमित्ताने सह्याद्रीतील मार्जार कुळातील 'लेपर्ड कॅट'सारख्या दुर्मीळ आणि दुर्लक्षित असलेल्या छोट्या मांजरांच्या संवर्धनाची गरज अधोरेखित झाली आहे. (leopard cat)
वनविभागाच्या कक्षेत राहूनही वन्यजीव आणि समाजमन यांचा सारासार विचार करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्याविषयी...
गुजरात राज्यातील जेरंबद बिबटे नर्मदा नदीमधून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दि. १८ जानेवारी रोजी स्थांनिकांनी समोर आणला होता (gujarat releasing leopards in maharashtra border). नंदुरबार वन विभागाने या प्रकरणाच्या केलेल्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे (gujarat releasing leopards in maharashtra border). महाराष्ट्र सरकारच्या सरदार सरोवर प्रकल्पातील बार्जचा वापर करुन गुजरातचे वनकर्मचारी महाराष्ट्रात बिबटे सोडत असल्याचे उघड झाले आह
चंदगड तालुक्यातील तिलारी नगर वसाहतीमधील बंद असलेल्या खोलीत सोमवार दि. २५ ब्लॅक पॅंथर (melanistic leopard) म्हणजेच काळ्या बिबट्याचे पिल्लू आढळून आले. प्रसंगी गावकऱ्यांनी हा परिसर लागलीच मोकळा केल्याने मादी ब्लॅक पॅंथर (melanistic leopard) येऊन पिल्लाला घेऊन गेली. दरम्यान दोडामार्गातही प्रौढ ब्लॅक पॅंथरचे दर्शन घडले आहे. (melanistic leopard)
पुण्यातील वाघोलीमधील डिकॅथलाॅनच्या आवारात शुक्रवार दि. २५ आॅक्टोबर रोजी आढळलेल्या जखमी बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश मिळाले आहे (leopard rescued from decathlon). रेस्क्यू-पुणे यांच्या मदतीने हे बचावकार्य पार पडले. या बिबट्याच्या पायाला इजा झाली असून सध्या त्याच्यावर पुण्यातील वन्यजीव बचाव केंद्रात उपचार सुरू आहेत. (leopard rescued from decathlon)
वसई किल्ल्यात मागील पंचवीस दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला मंगळवार दि. २३ मार्च रोजी पहाटे जेरबंद करण्यात आले (vasai fort leopard). वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या जेरबंद झाला. (vasai fort leopard)
रत्नागिरीतील सावर्डे येथे कोंबडांच्या कुऱ्हाड्यात अडकलेल्या बिबट्याचे बचाव कार्य बुधवारी वन विभागाने पार पाडले. रत्नागिरी वनपरिक्षेत्रात बिबट्या बचावाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आठवड्यातून किमान बिबट्याच्या किमान तीन घटना याठिकाणी घडत आहेत.
पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या पिंजऱ्यातून पळालेल्या नर बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. ( pune leopard resuced ) पुणे पालिका प्रशासनाने वन विभागाच्या मदतीने या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. ( pune leopard resuced ) ४८ तासानंतर ही कामगिरी फत्ते झाली. ( pune leopard resuced )
‘व्याघ्र’ग्रस्त चंद्रपूर
बिबट्या हा प्राणी आता माणसाच्या आसपास वावरणार्या प्राण्यांच्या यादीत सामील झाला आहे. बर्याच वेळा त्याचा माणसाशी अपघाताने संबंध येतो आणि त्यातूनच मानव-बिबट्या संघर्ष सुरू होतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येकाची स्वतःच्या मालकीची शेत किंवा घर विहीर वा आड असतोच. प्रत्येक गावात ठरावीक अंतरावर अशा प्रकारे विहीर किंवा आड पाहायला मिळतात. या विहिरींवरती काही ठिकाणी शेडनेट किंवा जाळीच्या आधारे विहिरीचा वरचा काठ बंदिस्त केला जातो.
केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने गुरुवार दि. २९ फेब्रुवारी रोजी देशातील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. (maharastra leopard) त्यानुसार देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १३ हजार ८७४ असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील बिबट्यांच्या संख्येत मध्यप्रदेशचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. (maharastra leopard)
आंबोलीतील काळ्या बिबट्याचे म्हणजेच ब्लॅक पॅंथरचे ( black panther ) पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. मात्र, यावेळीस हा प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला आहे ( black panther ). मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहलीदरम्यान या प्राण्याचे दर्शन झाले. ( black panther )
गेल्या काही काळात वातावरणातील दीर्घकालीन बदलांविषयी संशोधन आणि जागृतीही वाढलेली दिसते. या बदलांविषयी जैवविविधतेच्या घटकांवरील तसेच अखंड मानवजातीवरील परिणाम यानिमित्ताने प्रकाशझोतात येत आहेत. अशाप्रकारचे संशोधन, अभ्यास समोर आल्यास निश्चितच त्याचा उपयोग जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी करणे शक्य होणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये विजेचा धक्का देऊन तीन बिबट्याची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. सोमवार दि. २८ आॅगस्ट रोजी समोर आलेल्या प्रकारणामधील आरोपींना मंगळवार दि. २९ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. (gondia leopard)
वसईच्या ग्रामीण भागात विरार पूर्वेकडील खार्डी कोशिंबे गावाच्या हद्दीतील तळ्याचापाडा परिसरात अज्ञात हिंस्त्र रानटी प्राण्याने दोन कुत्रे, एक मांजर व गायीचे वासरू फस्त केल्याचे आढळुन आले आहे . मागील पंधरा दिवसांपासून घडलेल्या या घटनेने परिसरातील राहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . तो प्राणी बिबट्याच असावा असे येथील जुने जाणते रहिवाशी सांगत असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .त्यामुळे आता या भागातील जंगला शेजारी शेती असलेले शेतकरी संध्याकाळी लवकर घरी परतत आहेत .
सिंहगड किल्ला घेरा परिसरातील जंगलामध्ये बिबट्याचे दिसून आला. बिबट्या दिसल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. सिंहगडाच्या जंगलातील मोरदरवाडी भागामधील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. भांबुर्डावन विभाग आणि घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीच्या पथकाने मोरदरवाडी भागास भेट देऊन पाहणी केली.
काही दिवसांपूर्वीच नेपाळमधील बर्फाळ प्रदेशात वाघ आणि बिबट्याचा संचार तेथील पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांच्या निदर्शनास आला. त्यामुळे बर्फाळ प्रदेशांमध्ये अशा प्रकारे वाघ किंवा बिबट्यांचा होणारा वावर याकडे प्राण्यांच्या बदलत्या अधिवासाची खूण या दृष्टिकोनातून संशोधकांनी यावर अभ्यासही सुरू केला. यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, वन्यजीवांच्या अधिवासात होणारे हे बदल किती योग्य? किती अयोग्य? आणि त्यामागची नेमकी कारणं तरी काय?
बिबट्यांसाठी मोठा अधिवास असणारे नाशिक ‘बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्त संचार’ अशा बातम्यांमुळे नेहमीच चर्चेतअसते. बिबट्यांची संख्या वाढत असून त्याच्या सुरक्षेचा तसेच मानवाच्या संरक्षणाचा प्रश्न अधिकच तीव्र होताना दिसत आहे. या पाश्वर्र्भूमीवर ‘मानव-वन्यजीव संघर्ष’विराम होण्यासाठी पश्चिम वनविभाग व ‘वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ’जाणता वाघोबा’ उपक्रम राबवला जात आहे. बिबट्या आपला शत्रू नसून त्याच्याच अधिवासाजवळ मानव वसाहती जात असल्याने ’बिबट्यांसह जीवन’ संकल्पना येत्या काळात राबवण्यास
रशिया-युक्रेन युद्धाला पुन्हा एकदा तोंड फुटले असून राजधानी कीव्हवर रशियाच्या मिसाईल हल्ल्याचे वृत्त येऊन धडकले. अशा या जागतिक झळ बसलेल्या युद्धाची लवकरच वर्षपूर्ती होईल. अमेरिकेसह युरोपिय देशांची युक्रेनला मदत आणि युक्रेनच्या सैनिकांची चिवट झुंज यामुळे बलाढ्य रशियाला हवा तसा आतापर्यंत विजय मिळविता आला नाही. त्यातच आता जर्मनीने आपले ‘लेपर्ड-२’ रणगाडे युक्रेनला देण्याचे मान्य केले आहे. तेव्हा रशियाविरुद्धच्या युद्धात हे रणगाडे ‘गेमचेंजर’ ठरतील, अशी युक्रेनला आशा आहे.
चिपको आंदोलनापासून पुराव्यावर आधारित संवर्धनापर्यंत वन्यजीव संवर्धनाने खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि यामध्ये कॅमेरा ट्रॅपच्या शोधाने मोठी भूमिका बजावली आहे. कॅमेरा ट्रॅप्स म्हणजे काय आणि ते सध्याचे वन्यजीव वाचवण्यासाठी कसे वापरले जातात ते जाणून घेऊ या.
कायम विस्तारत जाणार्या मानवी वस्तीमुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गदा येताना दिसून येते. याचा परिणाम म्हणून मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढतो. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सकाळी 8च्या सुमारास, कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी जवळील अनुराग सोसायटीत एक प्रौढ नर बिबट्या शिरला आणि नऊ तासांचे धाडसी बचाव नाट्य घडले. ही घटना का घडली असावी, याची ऊहापोह करणारा हा लेख...
उत्तर मुंबईत असलेल्या आरे दुग्ध वसाहतीतील आदर्श नगर येथे शुक्रवारी दि. ११ नव्हेंबर रोजी सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. महिलेच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी तिला किमान तीन दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला आहे.
आरे दुग्ध वसाहतीतून दोन संशयित बिबट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका दीड वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू झाला होता. या नंतर आरे कॉलनीतील युनिट १५ मध्ये ट्रॅप कॅमेरा आणि पिंजरे लावण्यात आले होते. आरे दूध वसाहतीमध्ये आणि आरेमधील युनिट क्रमांक 15 च्या परिसरात मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांसाठी दोन संशयित नर बिबट्या जबाबदार असू शकत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते. युनिट १५ मध्ये वावर असलेले दोन संशयित बिबटे या पिंजऱ्यांमध्ये अडकले. बुधवार दि. २६ ऑगस्ट
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या आरे दुग्ध वसाहतीत सोमवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका दोन वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यू झाला आहे. आरे कॉलनीतील युनिट १५ मधील पाड्यात सकाळच्या वेळी सकाळी साडे सहाच्या सुमारास ही चिमुकली आपल्या आई सोबत घरी जात होती. दिवाळीचा पहिला दिवस असल्याने घराच्या आवारात दिवे लावून ही मुलगी घरी परतत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हेळवाक गावातून एका घरात शिरलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. गुरवार दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री नवरात्रोत्सव संपवून देवीच्या विसर्जनासाठी घराबाहेर गेलेल्या मंडळींच्या घरत बिबट्या शिरला होता. हा बिबट्या पाळीव कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला असल्याचा प्रार्थमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे.
पुण्यातील 'रेस्क्यू' या वन्यजीव बचाव संस्थेने जून महिन्यात वेळेत बिबट्यावर उपचार करत एका पाच महिन्याच्या मादी बिबट्याचे प्राण वाचवले. एका निरोगी बिबट्याकडून रक्त संक्रमण करून या अशक्त पिल्लाला देण्यात आले. उपचारानंतर हे पिल्लू स्थिरावले. आणि आता या पिल्लाची प्रकृती पूर्ण ठणठणीत आहे. सध्या हे पिल्लू 'रेस्क्यू'च्या पुण्यातील सेंटर ठेवण्यात आले आहे.
नाशिकमध्ये मार्च महिन्यात सापडलेली बिबट्याच्या (Leopard) तीन पिल्लांपैकी २ पिल्लांचा मृत्यू झाला आहे. ही पिल्ले जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेटीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांना पुढील देखलभालीकरिता मुंबईत पाठवण्यात आले होते. या पिल्लांमध्ये दोन मादी आणि एक नर पिल्लाचा समावेश होता. गेल्या पाच महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक प्राण्यांचा मृत्यू जाहला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातल्या एका शेतात दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढताना आढळून आले. या घटनेचे दृश्य कॅमेरात कैद करण्यात आले आहे. सध्या याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. शेतातील नारळाच्या झाडावर बिबट्या उतरून वर चढत असल्याचा व्हिडिओ आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एकामागून एक दोन बिबटे नारळाच्या झाडावर खेळताना दिसत आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील फिल्मसिटी परिसरात रविवारी सकाळी ९ महिन्यांचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ठाणे वन विभागाने हा मृतदेह ताब्यात घेतला असूनपुढील तपासणी साठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव केंद्रात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरावर अंतर्गत रक्तस्त्राव आणि श्वासोच्छवासाच्या समस्येशिवाय 'डोक्याला आघात' झाल्याचे आढळले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरातून मृत भारतीय गिधाडाचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. पश्चिम नाशिक इगतपुरी वन परिक्षेत्र कार्यालयाने ही कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी चौकशी दरम्यान हे अवशेष सापडले आहेत. आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर वन्यजीव सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन होणारी वन्यजीवांची होणारी शिकार रोखण्याचे आव्हान वनविभागापुढे निर्माण झाले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावातून रविवारी दि. ११ सप्टेंबर रोजी विहरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्वरित कारवाई करून या बिबट्याला वाचवण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणी केल्यानंतर या बिबट्याची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अंबोली गावातून बिबट्याच्या कातडीची तस्करी केल्या प्रकरणी सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी चार जणांना अटक करण्यात आली. इगतपुरी वन परिक्षेत्र कार्यालयाला मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाने बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चार इसमांना रंगे हात पकडले आहे. वन विभागाने खरेदी करण्याच्या आवेशाने सापळा रचून या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाई दरम्यान या आरोपींनी वन विभागाच्या कर्मचांऱ्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वन विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या चा
अमरावती जिल्ह्यातील महादेव खोरी भागातील वनविभागाच्या लागवड शेताजवळ बिबट्याची दोन पिल्ले गुरवारी दि. १ सप्टेंबर रोजी आढळून आली. या पिल्लांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. सकाळी लागवड शेतातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही पिल्ले आढळून आली. तात्काळ वन विभागाच्या रेस्क्यू युनिटला कळविण्यात आले. रेस्क्यू युनिटच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी जाऊन या दोन बिबट्यांच्या पिल्लांना ताब्यात घेतले.
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. पिंगोरी हे गाव पुरंदर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे. सोमवारी दि.१ ऑगस्ट रोजी रात्री हा बिबट्या रस्त्यावरुन जाताना गावकऱ्याने पहिला. माणसाला पाहून हा बिबट्या रस्त्यालगत असलेल्या झाडीत जाऊन बसला. आतापर्यंत बिबट्याने माणसावर हल्ला केलेला आहे.
भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-५३वर लाखनी आणि साकोली दरम्यान मोहघाटाजवळ तेलीनाला येथे मंगळवारी दि. २६ जुलै रोजी सायंकाळी एका भरधाव वाहनाने मादी बिबट्याला धडक दिली. या धडकेत मादी बिबट जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. या मादी बिबट्याची तपासणी करायला गेले असता तिने लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप यांच्यावर हल्ला केला. दरम्यान वनरक्षकाला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जून महिन्याच्या सुरवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब होते. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला. पुढील तपासात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब आहे. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईतील गोरेगावच्या बिंबीसार नगरमध्ये असलेल्या महापालिकेच्या शाळेतून बुधवारी दि. २९ रोजी पाहटे एका नर बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या संपूर्ण बचाव कार्याला सुमारे तीन तास लागले. या बिबट्याला पकडून, त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी करून या बिबट्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.
दीड महिन्यांपूर्वी शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेल्या नर बिबट्याचा वन विभागाने विरारहून बचाव केला होता. या अपघातामुळे बिबट्याला आपला पाय गमवावा लागला होता. परंतु, आता हा बिबट्या ठणठणीत झाला असून सक्षमपणे आपल्या तीन पायांवर चालू लागला आहे.
नाशिकमध्ये मार्च महिन्यात सापडलेली बिबट्याची तीन पिल्ले आज दि. १० जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहेत. पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेटीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांना पुढील देखलभालीकरिता मुंबईत पाठवण्यात आले. ही पिल्ले साडे तीन महिन्यांची असून त्यामध्ये दोन मादी आणि एक नर पिल्लाचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील खेडमधील जौलाके खुर्द गावात एक प्रौढ बिबट्या परिसरात फिरताना आढळून आला. महाराष्ट्र वनविभाग आणि 'वाईल्डलाईफ एसओएस'च्या दहा तासांच्या प्रदीर्घ मोहिमेनंतर शुक्रवारी दि. १३ रोजी रात्री बिबट्याची सुटका करण्यात आली.
रत्नागिरीतील कुर्ली गावात खाजगी मालकीच्या शेतात बिबट्या फासकीमध्ये अडकला होता.वनविभागाकडून वैद्यकीय चाचणी नंतर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आशुतोष तोडणकर यांनी काल दि. ११ रोजी तत्काळ वनविभागाला कळवली होती.
साताऱ्यातील कराड तालुक्यातल्या भोळेवाडी परिसरातील उसाच्या शेतात शनिवारी दि. १६ रोजी बिबट्याची दोन पिल्ले सापडली होती. या पिल्लांचे वय अंदाजे २५-३० दिवसांचे होते. ते आपल्या आई पासून दुरावले होते. कराड वनविभागाच्या तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पिल्लांची आईशी भेट घडवून देण्यात आली. सोमवारी रात्री ११:३० च्या सुमारास आई आपल्या पिल्लांनजवळ आली आणि त्यांना घेऊन गेली.
जुन्नरमधील शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून देण्यात आली आहे. पुणे वनविभाग आणि 'वाइल्डलाइफ एस.ओ.एस' यांनी हे काम पार पडले असून जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी येथे ही पिल्ले आढळून आली होती.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या रेस्क्यू टीमने विरारामधून जखमी बिबट्याचा बचाव केला आहे. हा बिबट्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात अडकून जखमी झाला होता. त्यामुळे लंगडत असलेल्या या बिबट्याला जेरबंद करुन बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात हलवण्यात आले आहे.