चिमुकलीच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची तत्परता; रस्त्यातच थांबवला ताफा!

    23-Nov-2026

 
Devendra Fadnavis Helps Girl
 
उल्हासनगर (Devendra Fadnavis Helps Girl): उल्हासनगर येथील नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चिमुकलीच्या उपचारांसाठी तातडीने मदत उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. 
 
मदतीची अपेक्षा घेऊन उभ्या असलेल्या तिच्या आई-वडिलांना पाहताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ताफा थांबवला. गाडीबाहेर येत त्यांनी पालकांशी संवाद साधून चिमुकलीच्या प्रकृतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. तिच्या उपचारांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Devendra Fadnavis Helps Girl)
 
मुख्यमंत्र्यांच्या या अनपेक्षित थांब्यामुळे चिमुकलीच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला. नियोजित कार्यक्रमाची घाई असतानाही एका गरजू कुटुंबाची व्यथा ऐकून घेत उपचारांसाठी तातडीने यंत्रणा कामाला लावण्याच्या त्यांच्या कृतीचे कौतुक होत आहे. (Devendra Fadnavis Helps Girl)
 
 
  
 




संबंधित मजकूर