मुंबई (Yogi Adityanath Mother Savitri Devi Death) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पंचूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर शनिवारी हरिद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त
सावित्री देवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर श्रद्धांजली अर्पण केली. "उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्या पूजनीय आई श्रीमती सावित्री देवी जी यांचे निधन अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. आईचे या जगातून जाणे ही आयुष्यातील अशी हानी आहे, जी कधीही भरून काढता येणार नाही," असे ते म्हणाले. (Yogi Adityanath Mother Savitri Devi Death)
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडूनही श्रद्धांजली
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही सावित्री देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी 'एक्स'वरील संदेशातून योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या. आईचे प्रेम, आशीर्वाद आणि माया ही आयुष्यातील अमूल्य संपत्ती असल्याचे सांगत, त्यांच्या निधनाने कुटुंबाची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे त्यांनी नमूद केले. (Yogi Adityanath Mother Savitri Devi Death)
तसेच, बाबा केदारनाथ यांनी दिवंगत सावित्री देवी यांच्या आत्म्यास सद्गती द्यावी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
सावित्री देवी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, विविध राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली आणि शोकसंदेश व्यक्त केले जात आहेत. (Yogi Adityanath Mother Savitri Devi Death)