मुंबई, : (Amit Satam Diya Mirza Controversy)आम्हाला दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे घेण्याची गरज नाही, असे खडेबोल मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी अभिनेत्री दिया मिर्झा हिला सुनावले. मुंबई महानगरपालिकेच्या प्रदुषणमुक्त दिवाळीच्या जनजागृती मोहिमेवरून वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.
वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करणारी जनजागृती मोहिम मुंबई महापालिकेकडून राबवण्यात येत आहे. मुंबईतील वायुप्रदुषण आणि ध्वनिप्रदुषण कमी करण्यासाठी यावेळी नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे, असा संदेश या मोहिमेतून दिला जात आहे. विविध क्रिकेटपटू आणि कलाकारांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.(Amit Satam Diya Mirza Controversy)
दरम्यान, अभिनेत्री दिया मिर्झा हिचा असाच एक व्हिडीओ मुंबई महापालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. मात्र, आ. अमीत साटम यांनी यावर आक्षेप घेतला. "आम्हाला दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आमच्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत," अशी पोस्ट करत त्यांनी यात महापालिकेला टॅग केले. त्यानंतर महापालिकेच्या अकाऊंटवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्यात आला. अभिनेत्री माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचेही दिवाळी जनजागृतीचे व्हिडिओ या मोहिमेत आहेत. मात्र, त्यांचे व्हिडिओ अद्याप सोशल मीडिया पेजवर कायम आहेत.
दिया मिर्झा हिचा व्हिडीओ हटवल्यानंतर तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली. “कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. आता तर चांगुलपणाचा जमनाच राहिला नाही,” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.(Amit Satam Diya Mirza Controversy)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....