श्रीनगर (Kulgam Terrorist Attack on CRPF) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील एका नाक्यावर सीआरपीएफचे जवान तैनात असताना हा हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच कुलगामचे जलद प्रतिसाद पथक (क्विक रिस्पॉन्स टीम) घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला. (Kulgam Terrorist Attack on CRPF)
सीआरपीएफच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी नाक्यावर तैनात असलेल्या जवानांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
सुरुवातीला सीआरपीएफच्या ४६व्या बटालियनच्या छावणीला लक्ष्य केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, सीआरपीएफने नाक्यावर तैनात असलेल्या जवानांवर गोळीबार झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेत तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Kulgam Terrorist Attack on CRPF)
जखमी जवानांची नावे समोर
या गोळीबारात राकेश दास, संतोष चंद्रू आणि सोमवीर सिंह हे तीन जवान जखमी झाले आहेत. (Kulgam Terrorist Attack on CRPF)
राकेश दास (कॉन्स्टेबल/जीडी) : त्यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
संतोष चंद्रू (कॉन्स्टेबल/जीडी) : त्यांच्या पोटात आणि मणक्याजवळ गोळी लागली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
सोमवीर सिंह (हेड कॉन्स्टेबल/जीडी) : त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
तिन्ही जवानांना उपचारासाठी अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Kulgam Terrorist Attack on CRPF)
परिसराची नाकेबंदी; हल्लेखोरांचा शोध सुरू
हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. परिसरात अतिरिक्त नाके उभारण्यात आले असून बख्तरबंद वाहनांसह सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा बुधवारी कुलगाम जिल्ह्यात उपस्थित होते. मात्र, ते हल्ला झालेल्या ठिकाणाजवळ नव्हते. सध्या पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हल्लेखोरांची ओळख पटवण्यासह त्यांच्या पळून जाण्याचा मार्ग शोधत आहेत. तसेच, या हल्ल्यामागील कारणांचाही तपास सुरू आहे. या घटनेनंतर कुलगामसह आसपासच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. (Kulgam Terrorist Attack on CRPF)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.