अन्नधान्यापासून खाद्यसंस्कृतीपर्यंत आत्मनिर्भर व्हा; ‘हर-हर’ उपक्रमातून अन्नपुरवठा साखळी मजबूत करण्याचे आवाहन

 
 
HARHAR 2026 Conference
 
मुंबई (HARHAR 2026 Conference): भारताने तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवली असली, तरी डाळी आणि खाद्यतेलाच्या बाबतीत आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. देशाला अन्नधान्यापासून खाद्यप्रक्रिया, हॉटेल व्यवसाय आणि जागतिक खाद्यब्रँडपर्यंत आत्मनिर्भर बनवण्यासाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस स्वामी विज्ञानानंद यांनी केले. ‘हर-हर’ उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. (HARHAR 2026 Conference)
 
हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ निर्मिती आणि आतिथ्य क्षेत्रातील उद्योजकांना एकत्र आणून व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘हरहर २०२६ -फ्रॉम हेरिटेज टू एंटरप्राइज’ या परिषदेचे आयोजन शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत करण्यात आले होते. हिंदू असोसिएशन ऑफ रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, आहार अँड रिफ्रेशमेंट्स (HARHAR) यांच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आले होते. (HARHAR 2026 Conference)
 
विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस स्वामी विज्ञानानंद, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. याचसोबत भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव मडगुजी होळी आणि हरहर हिमाचल प्रदेशचे कॅप्टन संजय प्रशार यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. (HARHAR 2026 Conference)
 
भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातील अन्नधान्यटंचाईचा संदर्भ देताना स्वामी विज्ञानानंद यांनी त्यांनी हरितक्रांतीमुळे गहू आणि तांदळाच्या उत्पादनात झालेल्या वाढीचा उल्लेख केला. मात्र, डाळींच्या देशांतर्गत मागणीच्या तुलनेत उत्पादन अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. डाळींच्या क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी सरकारने धोरणात्मक हस्तक्षेप करावा आणि उत्पादक, व्यापारी व तज्ज्ञांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. (HARHAR 2026 Conference)
 
खाद्यतेलाच्या आयातीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. भारतात मोहरी, खोबरेल आणि तीळ यांसारख्या तेलांचे उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे सांगत अन्नप्रक्रिया आणि पॅकेजिंग क्षेत्रातही भारताने जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता वाढवावी, असे ते म्हणाले. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मोठी विविधता असूनही भारतीय पदार्थांची चव, गुणवत्ता आणि वैशिष्ट्ये आधुनिक पद्धतीने सादर करून त्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. (HARHAR 2026 Conference)
 
हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई व्यवसाय आणि खाद्यपदार्थांच्या वितरण व्यवस्थेतील व्यावसायिकांनीही एकत्र येऊन संशोधन, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘हर-हर’ उपक्रमाने तांदूळ, गहू, डाळी, खाद्यतेल, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय अशा संपूर्ण अन्नपुरवठा साखळीतील घटकांना एकत्र आणावे. देशांतर्गत उत्पादन वाढवणे, आरोग्यदायी भारतीय खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे आणि भारतीय खाद्यब्रँड जागतिक स्तरावर प्रस्थापित करणे, ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे असावीत, असे विज्ञानानंद यांनी सांगितले. (HARHAR 2026 Conference)
 
‘हिंदू उद्योजकांनी आर्थिक एकजुटीसाठी पुढाकार घ्यावा’ -मंत्री मंगलप्रभात लोढा
 
देशाच्या आर्थिक आणि सामाजिक सामर्थ्यवृद्धीसाठी उद्योजकांनी वैयक्तिक व्यवसायाबरोबरच सामाजिक जबाबदारीलाही प्राधान्य द्यावे. उद्योग क्षेत्रातील योगदानाबरोबरच हिंदू समाजासाठी काम करण्याची मानसिकता उद्योजकांनी विकसित करावी. हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून व्यवसायांची आर्थिक क्षमता वाढवण्यासोबतच उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण झाली पाहिजे. या उपक्रमातील सहभाग हा केवळ वैयक्तिक लाभासाठी नसून, आगामी पिढ्यांच्या भवितव्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आर्थिक पाठबळ महत्त्वाचे असते. फोरममध्ये नोंदणी करण्याबरोबरच अधिकाधिक हिंदू व्यावसायिकांना या उपक्रमाशी जोडले पाहिजे. हिंदू समाजाची आर्थिक एकजूट आणि देशाच्या विकासातील सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. (HARHAR 2026 Conference)
 
‘हिंदूंनी हिंदूशीच आर्थिक व्यवहार करावेत’ -मंत्री नितेश राणे
 
हिंदू व्यापारी, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी एकत्र येऊन हिंदू समाजाची आर्थिक ताकद वाढवली पाहिजे. हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी आणि हिंदू व्यावसायिकांनाच प्राधान्य द्यावे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. ‘हर-हर’च्या माध्यमातून सुरू असलेली मोहीम यशस्वी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या हिंदू भूमीवर, महादेवाच्या भूमीवर आपण कोणताही व्यवहार किंवा खरेदी-विक्री करताना समोरची व्यक्ती हिंदू असली पाहिजे, अशी भूमिका आपण घेतली पाहिजे. आगामी कुंभमेळा आणि हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. व्यापारी संघटनांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. (HARHAR 2026 Conference)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर