एशियाटिक सोसायटीत २९ ऑक्टोबरला पाच ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे विविध पैलू उलगडणारे ग्रंथ प्रेक्षकांच्या भेटीला

    24-Oct-2026   

Chhatrapati Shivaji Maharaj Books
 
मुंबई : (Chhatrapati Shivaji Maharaj Books)एशियाटिक सोसायटी, मुंबईच्या वतीने ‘स्वराज्य: विविध पैलू, चिरंतन वारसा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आणि स्वराज्याचा इतिहास, आरमार, प्रशासन व अर्थव्यवस्था या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पाच ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
 
शिवचरित्राचा अत्यंत व्यापक वेध घेणारे हे पाच ग्रंथ शिवप्रेमी आणि इतिहासअभ्यासकांसाठी एक मोलाचा ठेवा ठरणार आहेत. ग्रंथांच्या संदर्भात इतिहासतज्ज्ञांचा विशेष परिसंवाद होणार असून, ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने हे लेखक व प्रकाशकांसोबत विशेष संवाद साधणार आहेत. या सोहळ्यात नरेंद्र मुरकुंबी, प्रदीप रावत, रघुजीराजे आंग्रे, एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता दरबार हॉल, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे सदर कार्यक्रम संपन्न होईल. इतिहासप्रेमींनी या ऐतिहासिक प्रकाशन सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Books)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर