नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील : मंत्री मंगलप्रभात लोढा

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि ‘गाव तिथे उद्योजक’ यांच्यात सामंजस्य करार


Rural Entrepreneurship in Maharashtra
 
मुंबई, : (Rural Entrepreneurship in Maharashtra)राज्यातील तरुण नवोन्मेषक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच तरुणांना रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
 
‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (मॅसिया) अंतर्गत कार्यरत ‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’ यांच्यात मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.(Rural Entrepreneurship in Maharashtra)
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील तळागाळातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’च्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी उपाय शोधणे, हा या सहकार्याचा प्रमुख उद्देश असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले.
 
या उपक्रमांतर्गत राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे, आयटीआय आणि पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धेची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना तसेच नवउद्योजकांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. निवडक नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य आणि त्यांच्या कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.(Rural Entrepreneurship in Maharashtra)
 
“राज्यातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण विचारांना आणि स्टार्टअप्सना योग्य दिशा देण्याचे काम या कराराच्या माध्यमातून होईल. ग्रामीण आणि निमशहरी भागातील गुणवंत तरुणांना उद्योगजगताशी जोडून त्यांच्या कल्पनांचे व्यावसायिक उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यावर भर दिला जाईल. यामुळे राज्यातील उद्योजकता परिसंस्थेला बळकटी मिळेल,” असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.
 
ग्रामीण उद्योजकतेला मिळणार बळ
 
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत ‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’चे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी ग्रामीण भागातील उद्योजकतेच्या संधी अधोरेखित केल्या. ग्रामीण भागातील अनेक युवक, महिला आणि स्थानिक कारागिरांकडे व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना आणि क्षमता आहेत. मात्र, योग्य मार्गदर्शन, भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायवाढीला मर्यादा येतात, असे त्यांनी सांगितले.(Rural Entrepreneurship in Maharashtra)
 
ही दरी भरून काढण्यासाठी गावपातळीपासून जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने उद्योगविषयक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीसाठी काम करण्यात येणार आहे. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेसाठीही संस्था जास्तीत जास्त सहकार्य करणार असल्याचे माणगावे यांनी सांगितले.
 
या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर आणि ‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’चे अध्यक्ष रवींद्र माणगावे उपस्थित होते.(Rural Entrepreneurship in Maharashtra)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर