_202610221155389815_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई : (Ramdas Athawale Statement) लोकशाहीत सरकारविरोधात आंदोलन केले जाऊ शकते.आंदोलनद्वारे बांगलादेशप्रमाणे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न भारतात यशस्वी होऊ शकत नाही.भारतात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे. निवडणुकीत बहुमत मिळवून सरकार स्थापन करता येते ;आंदोलनाच्या माध्यमातून सरकार बदलले जाऊ शकत नाही.भारतात खलिस्तान चे आंदोलन झाले; मराठवाडा विद्यापीठ आंदोलन झाले; शेतकरी आंदोलन झाले.भारतात आंदोलनाला एक मर्यादा आहे. बांगलादेश प्रमाणे भारतात आंदोलनातून सत्ताबदल होऊ शकत नाही अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.बांद्रा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राहूुल गांधी आणि अभिजित दिपके यांनी चालविलेले आंदोलन हे अराजकता पासरविण्याचा उद्देशाने लोकशाही ला धोका निर्माण करणारे आंदोलन आहे.असे ना. रामदास आठवले म्हणाले.(Ramdas Athawale Statement)
एस आय आर हे मतदान यादी दुरुस्ती साठी आहे.मतदान यादीतील कधीही न मतदान केलेले 3 करोड लोक; 2.8 करोड मरण पावलेल्या मतदारांची नावे आहेत. गावात आणि शहरात असे दोन्ही ठिकाणी नावे असणारी 1 करोड नावे तसेच 6.3 करोड लोकांचे स्थलांतर झाले आहे.असे एकूण 13 करोड लोकांची नावे मतदान यादीतून काढण्यात आलेली आहेत.मतदान यादी सुधारणा करणे योग्यच आहे. त्यामुळेनिवडणूक आयुक्तांचा राजीनामा मागंणे हा संवािधानाचा अवमान आहे.ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊ नेये.लोकशाही आणि संवािधानाच्या रक्षणासाठी नरेंद्र मोदी आणि आमची टीम मजबूत काम करीत आहोत.असे ना. रामदास आठवले म्हणाले.(Ramdas Athawale Statement)
राज्यात भीषण दुष्काळ पडलेला आहे. मराठवाड्यात शेतकरी आणि शेतमजूर सर्व दूुष्काळग्रस्त ग्रामस्थांची परिस्थिती वाईट आहे. छत्रपती संभाजी नगर;जालना; बीड; धाराशिव; परभणी आणि लातूर या जिल्ह्यांत दुष्काळ दौरा मी केल आहे. शेतकऱ्यांना दिवाळी साठी 5 हजार ऐवजी किमान 20 हजार आणि शेत मजूुराना 10 हजार मदत दिवाळीपूर्वीच दिली पाहिजे. तसेच दूुष्कळ ग्रस्तांना शासनाने प्रति हेक्टरी 50 हजार मदत केली पाहिजे असे ना. रामदास आठवले म्हणाले.
शिवसेनेचे दोन दासरा मेळावे होत आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खरी शिवसेना आहे.दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची धनुष्यबाण ही निशाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने कडे आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून काँग्रेस सोबत जाण्याचा अविचार उद्धव ठाकरे यांनी केला त्यामुळे धनुष्यबाण ऐवजी मशाल चीन्ह घेणे्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे.(Ramdas Athawale Statement)