माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाची पोती उचलण्यास मनाई

    19-Oct-2026   
 
Mathadi Workers 50 Kg Weight Limit
 
मुंबई (Mathadi Workers 50 Kg Weight Limit): कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकारने ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या पोत्यांमधून शेतमालाची चढ-उतार करण्यास मनाई केली आहे. राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार विभागाने दिले आहेत. सोमवारी, कामगार विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले.(Mathadi Workers 50 Kg Weight Limit)
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या कन्व्हेन्शन क्रमांक १२७ नुसार मालाची चढ-उतार किंवा हाताळणी करणाऱ्या कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा माल हाताळला जाऊ नये, असा निर्णय आहे. त्यानुसार यापूर्वीही राज्यात विविध सूचना व परिपत्रकांद्वारे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने कामगार संघटनांकडून शासनाकडे मागणी करण्यात येत होती. (Mathadi Workers 50 Kg Weight Limit)
बाजार समित्यांमध्ये जनजागृती
कांदा, बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवसायात ५० किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजनाची पोती माथाडी कामगारांकडून उचलणे त्यांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या किंवा पिशव्यांमधून माथाडी कामगारांकडून मालाची चढ-उतार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपर्यंत ठेवण्याबाबत माथाडी मंडळांनी बाजार समित्या, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. या निर्णयाची सर्व बाजार समित्यांमध्ये पुरेशी प्रसिद्धी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. (Mathadi Workers 50 Kg Weight Limit)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर