विधानसभा पोटनिवडणूक – ७ राज्यांतील १३ मतदारसंघांमध्ये मतदान

    10-Jul-2024
Total Views |
assembly by election


नवी दिल्ली :     लोकसभा निवडणुकीनंतर बुधवारी ७ राज्यांमधील विधानसभेच्या १३ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार पडली. बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात पोटनिवडणूक झाली आहे.

बिहारच्या रुपौली, बंगालच्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागरा आणि मणिकतला या जागांवर मतदान होत झाले. तमिळनाडूच्या विक्रवंडी, मध्य प्रदेशातील अमरवाडा (राखीव), उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर, पंजाबमधील जालंधर पश्चिम (राखीव), हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढमध्येही मतदान झाले आहे.

बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील रुपौली मतदारसंघातमध्ये पोटनिवडणूक झाली. जदयु आमदार बीमा भारती यांनी राजीनामा दिल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक झाली. रायगंज, राणाघाट दक्षिण, बागरा आणि माणिकतला या जागांवर आज मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत ३४ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

मध्य प्रदेश राज्यातील अमरवाडा या विधानसभा मतदारसंघात मतदान झाले आहे. हा मतदारसंघ जागा छिंदवाडा लोकसभा मतदारसंघांतर्गत येते. काँग्रेसचे आमदार कमलेश शाह यांनी पक्षपरिवर्तन केल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपकडून कमलेश शाह हे उमेदवार आहेत तर काँग्रेसने धीरेन शाह यांना उमेदवारी दिली आहे.

हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. या फेब्रुवारीमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या तीन अपक्ष आमदारांच्या राजीनाम्यामुळे या तीन जागा रिक्त झाल्या आहेत.