मुंबई, (अभिनंदन परुळेकर) : " ५८ लाख नोंदी शोधण्याचा निर्णय शासनाची शिंदे समिती घेते.पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा समितीमार्फत केला जातो. अजून नोंदी मिळवण्यासाठी काही पर्याय शोधते. यासोबतच ओबीसी समाजावर अन्याय न होता आम्हाला मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करायच्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की , मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत आणलेल्या आहेत,चर्चा सुरू राहिली पाहिजे चर्चा आम्ही बंद करणार नाही."असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवार दि.९ रोजी केले. (Maratha reservation movement)
मराठा आरक्षण प्रश्नावर शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांची एकत्र पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. (Maratha reservation movement)
"मराठा अभ्यासकांनी आमच्याकडे पाठ फिरवली नाही तर त्यांनी येऊ शकत नाही अशी पूर्वकल्पना आम्हाला दिली होती.मनोज जरांगे पाटील जसे आनंदात रहावे असे त्यांच्या समर्थकांना वाटते तसेच आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आनंद रहावेत त्यांना कोणताही त्रास नको अशीच भावना आमची देखील असते. त्यामुळे जे मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल कधीच वाईट बोलत नाहित त्यांच्याबद्दल वाईट बोलणं ही अयोग्य गोष्ट आहे. सरकार व आंदोलक यांच्यात दुरावा निर्माण करणारी जर व्यवस्था निर्माण झाली असेल तर ती वेळीच मनोज जरांगे पाटील यांनी ओळखून दूर करणे गरजेचे आहे."असेही मंत्री सामंत म्हणाले. (Maratha reservation movement)
"आमची मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाबरोबरच राज्यात इतर समाज एकत्रितपणे कसे नांदतील याची काळजी घ्यावी. हिंदूंचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव तोंडावर आला आहे. तसेच मराठवाड्यासह कोकणात पोळा हा सण असल्याने,मराठवाड्यात दुष्काळ स्थिती देखील असल्याने आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हे आंदोलन स्थगित करावे.त्यांनी सरकारला सहकार्य केल्यास आम्ही त्यांना सहकार्य करू.आज जी बैठक झाली त्यात हे समजले की अधिकाऱ्यांनी किती चांगले काम केले आहे.पाहिजे तर तुम्हाला त्याची कागदपत्र पण दाखवली जातील.आमची मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की त्यांनी स्वतःच्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्यावी आणि त्यांनी दिलेले काम आम्ही करूनच दाखवणार आहोत."अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली. (Maratha reservation movement)
अंतरवाली सराटी येथे १२ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी बैठक होणार असून तिथे आंदोलनाचे मुंबई संदर्भातील दिशा ठरणार आहे. आजचा आंदोलनाचा बारावा दिवस होता. मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी संयमी भाषेच आवाहन केल्यानंतरसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मात्र आपल्या भाषेत बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Maratha reservation movement)