मुंबई,(Mahesh Chandra Tripathi) : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन, मुंबई येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभात न्या. त्रिपाठी यांना पदाची शपथ दिली.(Mahesh Chandra Tripathi)
शपथविधीनंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन न्या. त्रिपाठी यांचे अभिनंदन केले. समारंभाच्या प्रारंभी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना आणि अधिपत्र वाचून दाखवले. राष्ट्रगान, वंदे मातरम् आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शपथविधीनंतर वंदे मातरम् आणि राष्ट्रगानाने समारंभाची सांगता झाली.(Mahesh Chandra Tripathi)
या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती सचिन अहिर, मंत्री छगन भुजबळ, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती उपस्थित होते.(Mahesh Chandra Tripathi)
मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती मोहित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनीही शपथविधी सोहळ्यास उपस्थिती लावली. न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपद रिक्त झाले होते. त्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र घुगे हे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. आता न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुख्य न्यायमूर्तीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.(Mahesh Chandra Tripathi)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.