मुंबई,(अभिनंदन परुळेकर) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतील पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे पक्षातर्फे निलंबन करण्यात आले. यामध्ये एकूण सात पदाधिकाऱ्यांचा समावेश असून बेजबाबदार वर्तणूक व पक्षशिस्त भंग केल्याबद्दल त्यांच्यावर मंगळवार दि. ८ रोजी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. तसे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
निलंबन केलेल्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये जिल्हाप्रमुख कुंदन बाळकृष्ण संखे, शहरप्रमुख राहुल रामदास घरत, युवा सेनेचे उप तालुकाप्रमुख मनीष उर्फ विकी संखे, युवा सेना जिल्हाप्रमुख साईराज पाटील, उप तालुका प्रमुख रोहीत गावीत, उपशहर प्रमुख राहुल संखे, युवा सेनेचे विधानसभा समन्वयक वृषभ वारे या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे