डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका

निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १६ मंडळांवर गुन्हे दाखल

    08-Sep-2026   
 
Pimpri Chinchwad Police Action


मुंबई (Pimpri Chinchwad Police Action) :
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर डीजे-डॉल्बी बंदीबाबत आधीच निर्देश देण्यात आले होते. असे असतानाही काही ठिकाणी डीजे-डॉल्बीचा वापर झाल्याचे निदर्शनास आले. कानठळ्या बसविणाऱ्या डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १६ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी साउंड सिस्टीम जप्त केल्याची माहिती आहे.(Pimpri Chinchwad Police Action)
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, यासाठी ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, दि. ५ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली.(Pimpri Chinchwad Police Action)
दहीहंडी कार्यक्रम सुरू असताना काही ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी सिस्टीम वाजविण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करून साउंड सिस्टीमचे साहित्य ताब्यात घेतले. या मोहिमेत एकूण १६ डॉल्बी स्पीकर, ॲम्प्लिफायर, मिक्सर तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. उत्सवाच्या नावाखाली ध्वनिमर्यादा मोडणाऱ्यांची यापुढेही गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.(Pimpri Chinchwad Police Action)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर