पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री अवैध चर्चवर पालिकेचा बुलडोझर!स्थगिती आदेश असूनही पाडकाम केल्याचा सदस्यांचा आरोप

    08-Sep-2026   

Pimpri Chinchwad Illegal Church Demolition
 
मुंबई (Pimpri Chinchwad Illegal Church Demolition) : पिंपरी-चिंचवडमधील तपकीर मळा परिसरातील एका अवैध चर्चवर रविवारी मध्यरात्री महापालिकेने कारवाई करत बुलडोझर फिरवला. न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेला असताना देखील कारवाई करण्यात आल्याचा आरोप चर्चच्या सदस्यांनी केला आहे. त्याचबरोबर पाडकामापूर्वी कोणतीही पूर्वसूचना देण्यात न आल्याचा दावा सदस्यांनी केला आहे.(Pimpri Chinchwad Illegal Church Demolition)
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेने राजवाडे नगर, काळेवाडी येथील जी वॉर्ड कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी कारवाई केल्याचे सांगितले. या कारवाईदरम्यान सुमारे ७,४०० चौरस फूट क्षेत्रफळातील बांधकामे पाडण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले. मात्र, चर्चच्या सदस्यांनी उल्लेख केलेल्या न्यायालयीन सुनावणी किंवा स्थगिती आदेशाबाबत महापालिकेच्या निवेदनात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.(Pimpri Chinchwad Illegal Church Demolition)
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या निवेदनात सांगितले की, दि. ७ सप्टेंबर रोजी राजवाडे नगर, काळेवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुमारे ७,४०० चौरस फूट क्षेत्रफळातील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण पाडकाम विभागाच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. विविध अभियांत्रिकी विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारीही या कारवाईत सहभागी झाले होते.(Pimpri Chinchwad Illegal Church Demolition)
 
महापालिकेच्या माहितीनुसार, १० कार्यकारी अभियंते, २८ उपअभियंते व कनिष्ठ अभियंते आणि १६ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या कारवाईत सहभागी झाले होते. वीज वितरण कंपनीचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुमारे ५५ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पाडकामासाठी ११ पोकलेन, ५ जेसीबी आणि २५ मजूर वापरण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी १२ अग्निशमन बंब आणि एका रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती.(Pimpri Chinchwad Illegal Church Demolition)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर